पिलीव येथील प्रज्ञा महा-ईसेवा केंद्र व सेंट्रल ह्युमन राईटच्या वतीने ३५१ बांधकाम कामगारांना भांडी संचाचे वाटप..!
पिलीव (बारामती झटका)
माळशिरस ता. पिलीव, येथील प्रज्ञा महा-ईसेवा केंद्र व सेंट्रल ह्युमन राईटच्या वतीने पिलीव व आसपासच्या नोंदणीकृत असंघटित ३५१ बांधकाम कामगारांना संसारपयोगी भांडी संचाचे प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत वाटप करणयात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आटपाडी येथील आंबेडकरी चळवळीचे ज्येष्ठ नेते अरुण वाघमारे, माळशिरस तालुक्याचे धडाडीचे नेते विकासदादा धाईंजे, ह्यूमन राईटचे डॉ. कुमार लोंढे, आरिफखान पठाण, चांदापुरीचे सरपंच जयवंत सुळ, बँक ऑफ इंडियाचे मॅनेजर दिपक खटके, पोलीस हवालदार दत्ता खरात, चेअरमन अविनाश जेऊरकर, विशाल साळवे, दामोदर लोखंडे, संजय पाटील, शिवराज पुकळे, अभिजीत सरवदे, सत्यवान वाघमारे सर, अभियंता खंडु माने, यासीन पठाण, शाम धायगुडे, प्रज्ञा महा-ईसेवा केंद्राचे सर्वेसर्वा रणजित सातपुते, गायकवाड, सुजित सातपुते यांच्यासह अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे मान्यवरांच्या हस्ते पुजन करुन या कार्यक्रमास सुरुवात करणयात आली.
यावेळी डॉ. कुमार लोंढे, आरिफखान पठाण, दत्ता खरात, विशाल साळवे, शिवराज पुकळे, विकास धाईंजे, दिपक खटके साहेब, अरुण वाघमारे यांनी मनोगत व्यक्त करीत रणजित सातपुते यांनी प्रज्ञा महा-ईसेवा केंद्र व सेंट्रल ह्युमन राईटच्या माध्यमातून पिलीव परीसरातील जवळपास दीड-दोन हजारापेक्षा जास्त कामगारांना पेटी असेल किंवा भांडी संच तसेच विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती जवळपास एक कोटीच्या आसपास मिळवुन दिली आहे. तसेच रणजित सातपुते यांनी प्रज्ञा महा-ईसेवा केंद्रात जवळपास तिनशे लाडक्या बहिणींना मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत मोफत आनलाईन फॉर्म भरुन दिले. त्या सर्व महीलांना पैसेसुद्धा मिळाले आहेत.
आज जवळपास ३५१ कामगारांना जवळपास ५० लाख रुपयांचे भांडी संचाचे रणजित सातपुते यांच्या प्रयत्नातुन वाटप होत आहे. एवढे मोठे काम रणजित सातपुते यांनी पिलीव परीसरात केल्याचे सर्वच मान्यवरांनी कौतुक केले. आज पिलीव येथे रणजित सातपुते यांच्या वाढदिवसानिमित्त हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. रणजित सातपुते यांनी रात्रंदिवस परिश्रम घेऊन ही नोंदणी अत्यल्प दरात करुन सर्व सामान्य बांधकाम कामगारांना हा लाभ मिळवुन दिला. या पुढेही वंचित बांधकाम कामगारांची प्राधान्याने नोंदणी करणार असुन जास्तीत जास्त सर्व सामान्यांना याचा लाभ मिळवुन देणार असल्याचे रणजित सातपुते यांनी यावेळी सांगीतले. या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन दामोदर लोखंडे यांनी केले तर आभार प्रज्ञा महा-ईसेवा केंद्राचे रणजित सातपुते यांनी मानले.
रणजीत सातपुते हा एक चळवळीतील प्रामाणिक व निस्वार्थी कार्यकर्ता आहे,पिलीवसह परिसरातील गरीब व गरजू लोकांनी त्याच्या संपर्कात राहून सर्व शासकीय योजनांचा लाभ घ्यावा. – विकास धाईंजे, माळशिरस आंबेडकरी चळवळीचे ज्येष्ठनेते
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.
ümraniye elektrikçi Google SEO çalışmaları sayesinde marka bilinirliğimiz arttı. https://www.royalelektrik.com/