ताज्या बातम्याशैक्षणिकसामाजिक

फक्त गुण नाही, प्रत्यक्ष प्रयोगशाळेतील अनुभवही आवश्यक !

बारामती झटका

आज आपले बरेचसे विद्यार्थी १०वी-१२वी उत्तीर्ण होतात, तसेच JEE, NEET, CET इ. सारख्या स्पर्धा परीक्षाही पार करतात. पण, एक क्षण थांबा आणि विचार करा…
तुमच्या मुलांनी कोणते प्रयोग स्वतः केले आहेत ? ते प्रयोगशाळेत गेलेत का ?

आज बहुतेक विद्यार्थ्यांचा दिवस कोचिंग क्लासेस व अकॅडम्यांमध्ये जातो. शाळेतील प्रयोग, प्रात्यक्षिकं, प्रयोगशाळा… सगळं मागे पडतंय… MCQ वाचून आणि मार्क मिळवून खरे वैज्ञानिक घडत नाहीत !

ही शिक्षणपद्धती तुमच्या मुलांचे गुण वाढवत असेल, पण कौशल्य कमी करत आहे! जर ११वी-१२वीमध्येच विद्यार्थ्यांनी रसायनशास्त्र, भौतिकशास्त्र, जीवशास्त्र, संगणक किंवा शेतीशास्त्राचे इ. प्रत्यक्ष प्रयोग केले नाहीत, तर उद्या ते संशोधन, औद्योगिक प्रयोगशाळा, वैद्यकीय क्षेत्र, अन्न सुरक्षा क्षेत्र
या सर्व ठिकाणी यशस्वी कसे होणार ?

पालक आणि शिक्षकांकरिता नम्र विनंती आहे की, केवळ मार्क पाहू नका.

शाळा किंवा कॉलेज निवडताना या गोष्टी तपासा :
त्या संस्थेत प्रयोगशाळा आहे का ?
प्रयोगांसाठी लागणारी साधने, केमिकल्स व सामग्री उपलब्ध आहे का ?
मुलांना स्वतः प्रयोग करायला दिले जाते का ?
प्रात्यक्षिक परीक्षांना खऱ्या स्वरूपात घेतलं जातं का ?

केवळ कोचिंग क्लासेस, अकॅडमीच्या चमकदार जाहिरातींना बळी पडू नका. फक्त मार्क नव्हे, मुलांचे भविष्य घडवणारे, प्रत्यक्ष अनुभव आणि प्रयोगशाळा प्रशिक्षण हे खरे मौल्यवान आहे.

जर तुम्हाला तुमच्या मुलांना खऱ्या अर्थाने स्पर्धेत टिकवायचं असेल, तर विचार नक्की करा. फक्त गुणांच्या शर्यतीत धावत राहू नका कारण, ज्याच्या हातात प्रत्यक्ष कौशल्य आहे, त्याच्याकडे भविष्याची चावी आहे.

प्रत्यक्ष अनुभव असेल तर तुमची मुलं-मुली स्वतःच्या पायावर उभं राहतील आणि अनेक शक्यतांचा शोध घेतील. डॉ. अनिल एच. गोरे (M.Sc., Ph.D.)
सहयोगी प्राध्यापक, रसायनशास्त्र
टीआयसीएस, यूटीयू विद्यापीठ, सुरत, गुजरात, मोबाईल 9975818177

हा महत्त्वाचा संदेश इतर पालक, शिक्षक, आणि विद्यार्थ्यांपर्यंत नक्की शेअर करा! उद्याचा सक्षम भारत — प्रयोगातूनच घडेल!

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.

Related Articles

Back to top button
marsbahis hacklink market casibom