पिलीवच्या कन्येचा सासरच्या लोकांनी कौतुक भरल्या नजरेने केला सन्मान…
पिलीव (बारामती झटका)
पिलीव ता. माळशिरस, येथील पत्रकार रघुनाथ गणपत देवकर यांची सुकन्या मयुरी रघुनाथ देवकर (जाधव) हिची पवित्रा पोर्टल मधून जिल्हा परिषद कोल्हापूरच्या माध्यमातून बच्चेसावरडे येथे नियुक्ती झाल्यावर सासरी भाळवणी येथील परिवाराने म्हणजेच सासरच्या मंडळींनी आपल्या जाधव परिवारातील पहिलीच महिला शासकीय सेवेमध्ये रुजू झाल्याचा आनंद व्यक्त करीत रुजू होऊन आल्यानंतर घराचा उंबरठा ओलांडताना फटाक्याच्या आतिषबाजीमध्ये स्वागत करून अनेक प्रकारच्या पुष्पमालांनी गुंफलेले पुष्पहार व गुच्छ देऊन हळदी कुंकवाचा सौभाग्याचा कार्यक्रम आयोजित करून मयुरी विनायक जाधव (सासरचे नाव) यांचे पेढा भरवून कौतुक भरल्या नजरेने सन्मान केला. यावेळी कुटुंबातल्या सर्व बालकांपासून ते वृद्धांपर्यंतच्या सदस्यांनी आनंद व्यक्त केला.
यावेळी जाधव परिवारातील ज्येष्ठ व पाटबंधारे विभागातील सेवानिवृत्त अधिकारी राजाभाऊ जाधव यांनी अभिमानाने आपल्या सुनेचे आपल्या मनोगतातून कौतुक व्यक्त करून हाच आदर्श आमच्या परिवारातील मुले मुली निश्चितपणाने घेतील, अशा प्रकारची अशा व्यक्त केली. यावेळी मयुरी यांच्या सासुबाई श्रीमती कुसुम ज्ञानेश्वर जाधव यांनीही मयुरी माझी सून नसून माझी लेक आहे, अशा प्रकारचे गौरवोद्गार काढुन आपल्या आनंदाश्रूंना वाट करून दिली.
या छोटेखाणी कौटुंबिक कार्यक्रमांमध्ये आपले मनोगत व्यक्त करताना मयुरी जाधव यांनी मला सासरी आल्यानंतर माझ्या सासरच्या सदस्यांनी माहेरच्या सदस्यांप्रमाणे मायेची सावली दिली आणि माझ्या सासूबाईंनी तर आईचे प्रेम दिले. पती, दिर, जाऊबाई यांनी प्रोत्साहन दिले, याची जाणीव भविष्य काळातसुद्धा मी ठेवून सासर माहेरचे सुसंस्कार भविष्यकाळातील ठेवा म्हणून त्याचा वापर करीन.
अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त करताना माहेरच ग्रामदैवत श्री महालक्ष्मीदेवी तर सासरचे ग्रामदैवत श्री शाकंभरी देवी व सर्व परमेश्वरांच्या कृपाशीर्वादाने व सर्वांच्याच आशीर्वादाने कुलदैवत श्री ज्योतिर्लिंग व श्री नागोबा यांच्या नगरीमध्ये मला सेवा करण्याची संधी मिळाली आहे. त्या संधीचा निश्चितपणे सदुपयोग करण्याचा प्रयत्न करीन अशा प्रकारचे मनोगत व्यक्त केले.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.
Very neat blog articleMuch thanks again Really Great