पिसेवाडी येथील धक्कादायक प्रकार : एका इसमाचा जमिनीच्या वादातून विष प्राशन करून जीवन संपवण्याचा प्रयत्न…

पिसेवाडी (बारामती झटका)
पिसेवाडी ता. माळशिरस येथील ५५ वर्षीय इसमाचा जमिनीच्या वादातून जाचाला कंटाळून विष प्राशन करून जीवन संपविण्याचा धक्कादायक प्रकार गुरुवारी घडलेला आहे.
सविस्तर हकीगत अशी की, जमिनीचा वाद सुरू आहे. गावातील गावगुंडांच्या व साथीदारांच्या जाचाला कंटाळून विष प्राशन केलेले होते. प्राथमिक आरोग्य केंद्र वेळापूरमध्ये उपचारासाठी घेऊन गेल्यानंतर सदरच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी अकलूज येथील उपजिल्हा रुग्णालयात घेऊन जाण्यासाठी सांगितले. उपजिल्हा रुग्णालयात प्राथमिक उपचार करून पुढील उपचार क्रीटी केअर हॉस्पिटल, अकलूजमध्ये सुरू आहेत.

दोन दिवसांनी प्रकृती स्थीरावल्यानंतर पोलीस स्टेशनमधील अधिकाऱ्यांनी सदरच्या विष प्राशन केलेल्या इसमाचा जबाब घेतलेला आहे. सदरच्या जबाबामध्ये जमिनीच्या वादातील जाचाला कंटाळून विष प्राशन केलेले आहे. गावगुंड व त्यांचे साथीदार यांचा नाहक त्रास होत होता. वारंवार विनवण्या करून सुद्धा जाच सुरू होता. वारंवार फोनवरून धमकी व अर्वाच्य शब्दात बघून घेण्याची भाषा बोलली जात होती. याचे सुद्धा रेकॉर्डिंग तयार आहे. यासाठी जीवन संपवणे हाच माझ्यापुढे पर्याय होता. त्यामुळे विष प्राशन केलेले असल्याचे सांगून पीडित यांनी जाच असणाऱ्या गावगुंडांचा व साथीदारांचा जबाबामध्ये उल्लेख केलेला असल्याची माहिती विष प्राशन केलेल्या इसमाच्या नातेवाईकांकडून समजलेली आहे.
सदरच्या घटनेची पोलीस स्टेशन येथे अद्याप नोंद झालेली नाही. गुन्हा नोंद झाल्यानंतर संबंधित लोकांची नावांसह माहिती समोर येणार आहे.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.