पोलीस महासंचालक यांच्या कार्यालयासमोर शरद जोशी विचार मंच शेतकरी संघटनेचे माळशिरस तालुकाध्यक्ष विष्णू वाघमोडे यांचे थाळीनाद आंदोलन…..
माळशिरस तालुका जिल्हा सोलापूर शासकीय गोदाम मधील बेकायदेशीररित्या चोरून वाहतूक करणाऱ्या शासकीय गोदामातील गहू वाहन पकडून देऊनही कारवाही न करणाऱ्या पोलीस अधिकारी व कर्मचारी यांचेवर कायदेशीर कारवाई होण्यासाठी आंदोलन…
माळशिरस (बारामती झटका)
शरद जोशी विचार मंच शेतकरी संघटनेचे माळशिरस तालुका युवक अध्यक्ष श्री. विष्णू अण्णा वाघमोडे यांचे पोलीस महासंचालक पोलीस मुख्यालय जुने कौन्सिल हॉल, शहीद भगतसिंग मार्ग, शहर मुंबई येथे दि. १०/६/२०२४ रोजी थाळी नाद आंदोलन करणार आहेत. सदरच्या निवेदनाच्या प्रती पोलीस महासंचालक, विशेष पोलीस महानिरीक्षक, परिक्षेत्र कोल्हापूर पोलीस उप अधीक्षक सोलापूर ग्रामीण, जिल्हाधिकारी सोलापूर, जिल्हा पुरवठा अधिकारी सोलापूर, उपविभागीय पोलीस अधिकारी अकलूज, उपविभागीय अधिकारी अकलूज, तहसीलदार माळशिरस, पोलीस निरीक्षक माळशिरस पोलीस स्टेशन यांना निवेदनाच्या प्रती दिलेल्या असून सदरच्या निवेदनावर श्री. विष्णू अण्णा वाघमोडे तालुकाध्यक्ष, श्री. सोमनाथ रामचंद्र सुतार तालुका उपाध्यक्ष, श्री. आनंदराव देवकाते तालुका कार्याध्यक्ष, श्री. शशिकांत नारायण वाघमोडे बाधित शेतकरी अशा पदाधिकाऱ्यांच्या स्वाक्षऱ्या केलेल्या निवेदनाच्या प्रती देण्यात आलेल्या आहेत.
सदरच्या निवेदनामध्ये विशेष पोलीस निरीक्षक कोल्हापूर परिक्षेत्र, कोल्हापूर पोलीस अधीक्षक, सोलापूर ग्रामीण सोलापूर, उपविभागीय पोलीस अधिकारी अकलूज विभाग, अकलूज पोलीस निरीक्षक, माळशिरस पोलीस स्टेशन माळशिरस यांच्याकडे वारंवार तक्रारी अर्ज दाखल करूनसुद्धा कारवाई केली जात नाही. सरकारी धान्य असलेली गाडी कायदेशीर मार्गाने चौकशी न करता आर्थिक देवाणघेवाण करून रात्रीच्या वेळी सोडून देण्यात आली आहे. याला जबाबदार असलेल्या महसूल अधिकारी सानप साहेब, लोखंडे साहेब, केमकर साहेब, आरती दुकानदार पवार व शशी निंबाळकर, धनाजी वाघमोडे, वाहन चालक नाना हांडे मोठेवाडी व पोलीस स्टेशनचे इन्चार्ज गायकवाड साहेब या सर्व लोकांनी बेकायदेशीररित्या शासकीय गोदामातील गहू काळ्या बाजारात विक्रीस जात असताना पकडून दिलेला ट्रक पूर्ण चौकशी न करता तक्रारदाराची तक्रार न घेता परस्पर संगनमताने बेकायदेशीररित्या सोडून दिला आहे, या सर्व अधिकाऱ्यांवर कारवाई करावी.
याबाबत माळशिरस पोलीस स्टेशन अंतर्गत शासकीय गोदामातील बाजाराने घेऊन जाणारा गव्हाचा ट्रक गाडी नंबर MH 12 LT 7677 ही गाडी अर्जदार व ग्रामस्थ यांनी पाठलाग करून गारवाड पाटी या ठिकाणी थांबवून सदर गाडी माळशिरस पोलीस स्टेशनच्या कर्मचारी व अधिकारी यांच्या ताब्यात दिली. त्यानंतर स्वतः अर्जदार फिर्याद देण्यास तयार असताना अर्जदाराची फिर्याद घेतली नाही. सदरील गाडी माळशिरस पोलीस स्टेशन या ठिकाणी दि. 22/02/2023 रोजी सदरील गाडी माळशिरस पोलीस स्टेशनच्या ताब्यात दिली. परंतु, माळशिरस पोलीस स्टेशन यांनी गाडी ताब्यात दिल्यापासून कोणतीही कारवाई केली नाही. त्यानंतर महसूल अधिकारी व गाडीमालक यांनी संगनमताने सदरील गाडीतील गहू फॉरेन्सिक लॅब रिपोर्टला न पाठवता सोडून दिली. तसेच सदरील गाडीच्या एकूण वजन जीएसटी बिल खरेदी विक्रीच्या पावत्या त्या दिवशीच्या गाडीमालकाकडे उपलब्ध नसताना आर्थिक देवाण-घेवाणीतून अर्जदार यांची तक्रार न घेता परस्पर गाडी सोडून दिली आहे. त्यामुळे त्यामध्ये दोषी असणाऱ्या अधिकारी व कर्मचारी यांच्यावर पदाचा दुरुपयोग करून बेकायदेशीर मार्गाने गाडी मालकावर कारवाई न करणाऱ्या माळशिरस पोलीस स्टेशनचे प्रभारी गायकवाड साहेब यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी व केलेल्या कार्यवाहीची प्रत अर्जदार यांना देण्यात यावी अन्यथा अर्जदार पोलीस महासंचालक पोलीस मुख्यालय मुंबई यांचे कार्यालयासमोर दि. १०/०६/२०२४ रोजी दुपारी १२ वाजता थाळी नाद आंदोलन करणार आहेत. असे लेटर पॅडवर निवेदन माळशिरस तालुका युवक अध्यक्ष श्री. विष्णू अण्णा वाघमोडे यांनी दिलेली आहे.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.
buy viagra online
payday loan
I enjoyed the wit in this article! For more on this, visit: READ MORE. What do others think?
Very well-written and funny! For more details, click here: EXPLORE NOW. Looking forward to everyone’s opinions!
penis enlargement
watch porn video
Online poker