ताज्या बातम्यासामाजिक

उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय अकलुज उपविभाग अकलुज बेपत्ता व्यक्तींचा शोध घेणे मोहीम…

अकलूज, माळशिरस, वेळापूर, नातेपुते अंतर्गत भरीव कामगिरी करणाऱ्या विशेष पथकांना बक्षीस जाहीर..

अकलूज (बारामती झटका)

मा. पोलीस अधिक्षक सोलापूर ग्रामीण यांनी सोलापूर ग्रामीण जिल्ह्यातील सन 2024 व 2025 मधील बेपत्ता व्यक्तीचा शोध घेणे बाबत दि. 02/04/2025 रोजी पासुन दि. 05/04/2025 रोजी पर्यंत विशेष मोहीम राबविलेली आहे.

अकलुज उपविभागातील सन 2024 मध्ये बेपत्ता झालेल्या इसमांपैकी एकुण 35 स्त्री/पुरुष मिळुन आलेले नव्हते, तसेच सन 2025 मध्ये बेपत्ता झालेल्या इसमांपैकी एकुण 25 स्त्री/पुरूष मिळुन आलेले नव्हते.

मा. पोलीस अधिक्षक श्री. अतुल कुलकर्णी सो. तसेच मा. अपर पोलीस अधिक्षक श्री‌. प्रितम यावलकर सो. यांचे मार्गदर्शनाखाली अकलुज उपविभागामध्ये उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. नारायण शिरगांवकर यांनी उपविभागातील प्रलंबीत बेपत्ता इसमांचे शोधा करीता अकलुज, माळशिरस, नातेपुते, वेळापूर या पोलीस ठाणे कडील विशेष पथकाची नेमणुक केली व दि. 02/04/2025 ते दि. 05/04/2025 या कालावधी मध्ये विशेष पथकामार्फत बेपत्ता इसमांचा शोध घेण्यात आला. प्रलंबीत असलेल्या बेपत्ता असलेल्या एकुण 60 स्त्री/पुरूष इसमांपैकी सन 2024 मधील एकुण 14 स्त्री/पुरुष व सन 2025 मधील एकुण 13 स्त्री/पुरूष असे एकुण 27 स्त्री/पुरुष इसम मिळुन आलेले आहेत. बेपत्ता इसमांचे शोध मोहीमेमध्ये केलेल्या भरीव कामगीरी मा. पोलीस अधिक्षक सो. सोलापूर ग्रामीण यांनी विशेष पथकाचे अभिनंदन करून बक्षीस जाहीर केले आहे. बेपत्ता इसमांचे शोध मोहीमेमध्ये अकलुज पोलीस ठाणे कडील म. पोसई वनवे, पोहेकाँ/308 कुंभार, पोहेकाँ/980 बागडे, पोहेकाँ/549 गुरव, पोहेकाँ/1623 पोरे यांनी कामकाज केले आहे. माळशिरस पोलीस ठाणे कडुन म. पोसई पवार, पोहेकाँ/1581 थोरात, पोहेकाँ/1586 शिंदे, पोहेकाँ/49 परांडे, पोना/1177 खरात यांनी कामगीरी केली आहे. तसेच वेळापूर पोलीस ठाणे कडुन श्रेणी पोसई श्री. रेगुडे, पोहेकाँ/1579 पाटील, पोकाँ/1337 पांढरे, पोहेकाँ/1565 मेहरकर यांनी काम केले. त्याच प्रमाणे नातेपुते पोलीस ठाणे कडुन पोसई श्री. ओमासे, पोना/562 लोहार, पोकाँ/666 कुलकर्णी, म. पोकाँ/1245 बोंदर यांनी कामकाज पाहीले आहे.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.

Related Articles

Back to top button