ताज्या बातम्यासामाजिक

पोलीसांनी सराईत वाहनचोरटयास अटक करून वाहनचोरीचे तिन गुन्हे उघडकीस आणून चार दुचाकी वाहने केली जप्त.

बिबवेवाडी (बारामती झट)

बिबवेवाडी पोलीसांनी दमदार कामगिरी बजावली आहे. सराईत वाहनचोरटयास अटक करून वाहनचोरीचे तिन गुन्हे उघडकीस आणून चार दुचाकी वाहने जप्त करून वाहन चोरट्यांना जेरबंद केले आहे.

सदरबाबत अधिक माहिती अशी की, दि. ११/०२/२०२५ रोजी सायंकाळी ०६.०० वा. ते ०८.३० वा. दरम्यान शिवतेज नगर, शेळकेवाडा प‌द्मावती मंदिर जवळ, अप्पर इंदिरानगर, बिबवेवाडी, पुणे येथून एक हिरो कंपनीची स्प्लेंडर प्लस मोटारसायकल जिचा आर.टी.ओ. क्र. एम.एच. १२ के. बी. १५८६ मोटारसायकल लॉक व पार्क करुन ठेवली केली असता ती अज्ञात इसमाने चोरुन नेली असलेबाबत फिर्यादी यांनी तक्रार दिलेने बिबवेवाडी पोलीस स्टेशन गुन्हा रजि.नं. ३९/२०२५ भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ३०३ (२) प्रमाणे गुन्हा दाखल आहे.

दाखल गुन्ह्यातील अज्ञात आरोपीचा वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर साळुंखे व पोलीस निरीक्षक गुन्हे सुरज बेंद्रे, यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उप निरीक्षक श्री. अशोक येवले, परि. पोलीस उपनिरीक्षक ए. बी. भुवड, तपासपथकातील अंमलदार यांनी गुन्ह्याचे घटनाठिकाणी भेट देवून सीसीटीव्ही फुटेज तपासून आरोपीचे मोडस वरून पोलीस अंमलदार रक्षिक काळे, ज्योतिष काळे व अभिषेक धुमाळ यांना त्यांचे बातमीदारांकडून मिळालेल्या बातमीवरून दाखल गुन्ह्यातील रेकॉर्डवरील आरोपी अर्जुन हिराजी भोसले, वय २० वर्षे, रा. सुवर्णयुग मित्र मंडळ जवळ, अप्पर बिबवेवाडी पुणे, यास दिनांक १९/०२/२०२५ रोजी अटक करून त्याचेकडे दाखल गुन्ह्याबाबत अधिक तपास करता त्याने मौज मजेसाठी व पैशांसाठी चोरलेबाबत सांगितले असून दाखल गुन्हा केल्याचे कबुल केले. त्याचेकडे गुन्ह्याचे तपासामध्ये त्याचेकडून १) बिबवेवाडी पोलीस स्टेशन गुन्हा रजि. नं. ३९/२०२५ भारतीय न्यायसंहिता २०२३ चे कलम ३०३ (२), २) बिबवेवाडी पोलीस ठाणे गुन्हा रजि. नं. ४३/२०२५ भारतीय न्यायसंहिता २०२३ चे कलम ३०३ (२), ३) फरासखाना पोलीस स्टेशन गुन्हा रजि. नं. ३९/२०२५ भारतीय न्यायसंहिता २०२३ चे कलम ३०३ (२) अशी एकूण १,०५,०००/-कि. रू. ची, एक हिरो कंपनीची स्प्लेंडर प्लस मोटारसायकल, एक बजाज ऑटो लिमीटेड कंपनीची के. टी. एम. ड्युक मोटार सायकल, एक सुझुकी कंपनीची अॅक्सीस दुचाकी मोपेड अशा तिन मोटर सायकल तसेच एक हिरो एच. एफ. डिलक्स गाडी हस्तगत करण्यात आलेल्या आहेत. हिरो एच.एफ. डिलक्स गाडीमालकाचा शोध घेवून अधिक तपास करत आहोत. दाखल गुन्ह्याचा पुढील तपास परि. पोलीस उपनिरीक्षक, ए. बी. भुवड हे करीत आहेत.

सदरची कामगिरी मा. पोलीस आयुक्त श्री. अमितेशकुमार, मा. सह पोलीस आयुक्त श्री रंजनकुमार शर्मा, मा. अप्पर पोलीस आयुक्त श्री. मनोज पाटील, मा. पोलीस उप आयुक्त श्री. राजकुमार शिंदे, परिमंडळ ५ पुणे शहर, मा. सहा. पोलीस आयुक्त श्री. धन्यकुमार गोडसे, वानवडी विभाग पुणे शहर यांचे मार्गदर्शनाखाली, वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. शंकर साळुंखे, पोलीस निरीक्षक गुन्हे श्री. सुरज बेंद्रे, तपास पथकातील अधिकारी पोलीस उप निरीक्षक श्री. अशोक येवले, परि. पोलीस उपनिरीक्षक ए. बी. भुवड, पोलीस हवालदार संजय गायकवाड, संतोष जाधव, पोलीस अंमलदार ज्योतिष काळे, रक्षित काळे, अभिषेक धुमाळ, बसवणप्पा गजा, शिवाजी येवले, विशाल जाधव, आशिष गायकवाड, सुमित ताकपेरे, दत्ता शेंद्रे यांनी केली आहे.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.

Related Articles

Back to top button