प्रा. अर्जुन ओवाळ यांचा ६१ व्या वाढदिवसानिमित्त माळीगरच्या गुलमोहर प्रशालेत सत्कार!
माळीनगर (बारामती झटका)
माळशिरस तालुक्यातील माळीनगरच्या गुलमोहर इंग्लिश मेडियम स्कूलमध्ये दि. २६ डिसेंबर रोजी सेवा निवृत्त मराठी विषयाचे आदर्श शिक्षक प्रा. अर्जुन ओवाळ यांचा सत्कार प्राचार्य श्री. वसंत आंबेडकर यांच्या हस्ते करण्यात आला. सत्कारानंतर प्रा. अर्जुन ओवाळ यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
यावेळी बोलताना ते म्हणाले कि, तत्कालीन संस्थेचे सचिव रंजनभाऊ गिरमे यांनी माझी नेमणूक केली. माझी शिफारस मुख्याध्यापक राऊत व इंग्लिश विषयाचे दिलिप सर यांनी केली. पंचवीस वर्षे काम करत असताना संगीत विभागाचे काम केले. शासकीय योजनाचा फायदा विद्यार्थांना, शाळेला, संस्थेला करून दिला आहे. पत्रकारिता करताना जनहिताच्या बातम्या दिल्या आहेत व त्याची दखल घेतली आहे.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.