प्राचार्यांच्या विविध प्रश्नाबाबत संचालक कार्यालयात बैठक संपन्न
पुणे (बारामती झटका)
शुक्रवार दि. 19 जुलै 2024 रोजी दुपारी 4 वाजता माननीय शिक्षण संचालक उच्च शिक्षण महाराष्ट्र राज्य, पुणे यांचे समवेत महाराष्ट्र राज्य प्राचार्य महासंघाच्या प्रतिनिधीची बैठक संपन्न झाली. सदर बैठकीत सहाव्या वेतन आयोगातील प्राचार्यांचा मिनिमम बेसिक 43000 करण्याबाबत जीआरमध्ये आवश्यक ती दुरुस्ती करण्याबाबत तसेच सर्व प्राचार्यांना 13 A ऐवजी 14 टेबलमध्ये वेतन निश्चिती करून प्रोफेसरपदाचा स्केल व दर्जा देणे बाबत सकारात्मक चर्चा झाली.
सदर दुरुस्ती केल्यामुळे शासनावर पडणाऱ्या आर्थिक भाराची तरतूद अर्थ खात्याकडून करून घेऊन शासन आदेश लवकरात लवकर काढण्यात येईल, असे त्यांनी सांगितले. तसेच तासिका तत्वावरील शिक्षकांचे मानधन वाढविणे आणि शिक्षकेतर सेवक (नॉन टिचिंग) ची 1400 पदे मंजूर करण्याबाबत शासनाकडे प्रस्ताव पाठवल्याची माहिती माननीय संचालकाने बैठकीत दिली दिली.
प्राचार्यांना 62-65 सरसकट न देता शासनाच्या 2018 च्या जीआर मध्ये नमूद केलेल्या प्रोसिजर नुसार कार्यवाही करण्यात येईल असे त्यांनी सांगितले. प्राचार्यांची पाच वर्षासाठीची नियुक्तीची पद्धत पूर्वीप्रमाणेच चालू राहील ती रद्द करता येणार नाही, असे त्यांनी सांगितले. ग्रंथपाल व शारीरिक शिक्षण संचालक हि पदे रिक्त असल्यास घड्याळी तासिका पद्धतीने भरण्यास मान्यता देण्यात यावी, अशीही मागणी यावेळी बैठकीत करण्यात आली.
सदर बैठकीस महाराष्ट्र राज्याच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे संचालक डॉ. शैलेंद्र देवळाणकर तसेच सहसंचालक डॉ. प्रकाश बच्छाव, महाराष्ट्र राज्य प्राचार्य महासंघाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. आबासाहेब देशमुख, उपाध्यक्ष प्राचार्य नंदकुमार निकम, सचिव प्राचार्य डॉ. सुधाकर जाधवर, प्राचार्य डॉ. संजय खरात, प्राचार्य डॉ. क्रांतीकुमार पाटील इत्यादी उपस्थित होते.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.
Hi Neat post There is a problem along with your website in internet explorer would test this IE still is the market chief and a good section of other folks will pass over your magnificent writing due to this problem