प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचे भाजपचे कट्टर व निष्ठावान अकलूज शहराध्यक्ष महादेव कावळे यांना अभिनंदनाचे पत्र…

माढा लोकसभेचे कार्यतत्पर व पाणीदार माजी खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर, सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे, माळशिरस विधानसभेचे लोकप्रिय दमदार माजी आमदार राम सातपुते यांचा विश्वासू शिलेदार व भाजपच्या निष्ठावान कार्यकर्त्यांचा पक्ष वाढीचा गुणगौरव…
अकलूज (बारामती झटका)
महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री तथा भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी भारतीय जनता पक्षाचे कट्टर व निष्ठावान अकलूज शहराध्यक्ष महादेवराव कावळे यांना अभिनंदनाचे पत्र पाठवून पक्ष वाढीसाठी केलेल्या कार्याचा गुणगौरव केलेला आहे. माढा लोकसभेचे कार्यतत्पर व पाणीदार माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास व पंचायत राज मंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार जयकुमार गोरे, भारतीय जनता युवा मोर्चाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष व माळशिरस विधानसभेचे लोकप्रिय दमदार माजी आमदार राम सातपुते यांचा विश्वासू शिलेदार व भाजपचा निष्ठावान कार्यकर्ता यांचा पक्ष वाढीचा गुणगौरव केलेला आहे.
माळशिरस तालुक्यामध्ये भारतीय जनता पक्षामध्ये किती आले आणि किती गेले, तरीसुद्धा अकलूजसारख्या प्रस्थापित राजकीय घराण्याच्या दबावाला व अमिषाला बळी न पडता भारतीय जनता पक्षाचे काम महादेवराव कावळे व त्यांच्या सहकाऱ्यांनी जोमाने केलेले आहे. माळशिरस तालुक्यातील कार्यकर्त्यांना माढा लोकसभेचे कार्यतत्पर व पाणीदार तत्कालीन खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर व माळशिरस विधानसभेचे लोकप्रिय दमदार तत्कालीन आमदार राम सातपुते हे दोन लोकप्रतिनिधी झाल्यानंतर खऱ्या अर्थाने माळशिरस तालुक्यात भारतीय जनता पक्षाचे संघटन वाढलेले आहे. लोकसभा व विधानसभेच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांचा पराभव जरी झाला असला तरीसुद्धा भारतीय जनता पक्षाचे संघटन माळशिरस तालुक्यात वाढण्याकरता माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर व माजी आमदार राम सातपुते यांचे सातत्याने प्रयत्न सुरू आहेत. सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार जयकुमार गोरे यांच्याकडे पदभार आल्यानंतर भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये ऊर्जा निर्माण झालेली आहे. अकलूजसारख्या परिसरात महादेवराव कावळे व त्यांचा मित्रपरिवार यांनी भारतीय जनता पक्षाचे संघटन वाढवलेले आहे. अकलूज-माळेवाडी नगरपंचायत हद्दीत भारतीय जनता पक्षाच्या 16 शाखा काढलेल्या आहेत. उर्वरित शाखांचे लवकरच उद्घाटन होणार आहे. महादेवराव कावळे यांनी सदस्यता अभियानाला चालना दिलेली आहे. त्यांच्या कार्याचे गुणगौरव महसूल मंत्री तथा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी अभिनंदनाचे पत्र पाठविलेले आहे.

सदरच्या पत्रामध्ये, भारतीय जनता पार्टीच्या संघटनपर्वामध्ये आपण १००० सदस्य नोंदणी करून त्यांना भारत देशाच्या पुनर्निर्माणाच्या प्रवासात सहभागी करून घेतल्याबद्दल आपले मनःपूर्वक अभिनंदन !
भाजपाचे अंत्योदयाचे धोरण आपण जनमानसात घेऊन जात आहोत. यातून आपली लोकांप्रती असलेली बांधिलकी आणि पक्ष विचारांप्रती असलेली निष्ठा अधोरेखित होते. आपल्या या समर्पित योगदानाबद्दल पक्षाध्यक्ष म्हणून मला आदर आणि अभिमान वाटतो.
आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात भारताची मान जगभरात उंचावली आहे, तर आपले आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात महाराष्ट्र थांबणार नाही, याची सर्वांना खात्री आहे.संघटनपर्वात किमान एक हजार सदस्य भाजपा सोबत जोडून आपण संघटना बळकट केलीच आहे, शिवाय महाराष्ट्राच्या विकासासाठीचे दूतही आपण जोडून घेतलेले आहेत.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.