प्रजासत्ताक दिनी उप विभागीय अधिकारी वैभव नावडकर यांच्या हस्ते ध्वजवंदन

बारामती (बारामती झटका)
भारताच्या ७७ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त बारामती येथील रेल्वे मैदानावर उप विभागीय अधिकारी वैभव नावडकर यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आले. श्री. नावडकर यांनी या कार्यक्रमात सहभागी झालेल्या संचलन पथकाचे निरीक्षण केले. पथकात शहर पोलीस दल, राष्ट्रीय छात्र सेना, नागरी संरक्षण दल, रस्ता सुरक्षा पथक, अग्निशमन दल यांचा समावेश होता. सर्व पथकांनी संचलनाद्वारे प्रमुख पाहुण्यांना मानवंदना दिली.
यावेळी उप विभागीय पोलिस अधिकारी डॉ. सुदर्शन राठोड, ‘एमआयडीसी’ चे प्रादेशिक अधिकारी हनुमंत पाटील, तहसीलदार स्वप्नील रावडे, गट विकास अधिकारी किशोर माने, मुख्याधिकारी पंकज भुसे, निवासी नायब तहसीलदार नामदेव काळे, विविध विभागाचे शासकीय अधिकारी, पत्रकार, स्वातंत्र्यसैनिक, स्वातंत्र्य सैनिकांचे उत्तराधिकारी, शहरातील मान्यवर व नागरिक उपस्थित होते.
श्री. नावडकर यांनी उपस्थित नागरिकांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या. शालेय विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमांनी सोहळ्याची सांगता झाली. यावेळी सांस्कृतिक कार्यक्रमात सहभागी झालेल्या पथकांना मान्यवरांच्या हस्ते सन्मानपत्राचे वितरण करण्यात आले.

प्रशासकीय भवन येथे ध्वजवंदन
मुख्य कार्यक्रमापूर्वी प्रशासकीय भवन येथे ध्वजवंदन प्रशासकीय भवन येथील प्रांगणात तहसीलदार स्वप्नील रावडे यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आले. यावेळी निवासी नायब तहसीलदार नामदेव काळे, तहसील कार्यालय तसेच प्रशासकीय भवनातील विविध विभागाचे अधिकारी कर्मचारी, नागरिक उपस्थित होते.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.



