प्रसिद्ध वक्ते युवा कीर्तनकार प्रखर विचारवंत ह. भ. प. श्री. सोपानदादा महाराज कनेरकर, अमरावती यांचे सुश्राव्य कीर्तन होणार….
![](https://baramatizatka.com/wp-content/uploads/2025/02/WhatsApp-Image-2025-02-11-at-3.45.56-PM-683x470.jpeg)
पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या परमपूज्य मातोश्री स्वर्गीय कमलताई भगवानराव गोरे यांच्या तेराव्या पुण्यस्मरण दिनानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन…
दहिवडी (बारामती झटका)
महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास व पंचायत राज मंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या परमपूज्य मातोश्री स्वर्गीय कमलताई भगवानराव गोरे यांच्या तेराव्या पुण्यस्मरण निमित्त बुधवार दि. 12/02/2025 रोजी सकाळी दहा ते साडेबारा या वेळेमध्ये प्रसिद्ध वक्ते युवा कीर्तनकार प्रखर विचारवंत ह. भ. प. श्री. सोपानदादा महाराज कनेरकर, अमरावती यांचे सुश्राव्य कीर्तन कमलकुंज, मु. बोराटवाडी, पो. बिदाल, ता. मान (दहिवडी), जि. सातारा येथे संपन्न होणार आहे.
सदरच्या किर्तनामध्ये मृदंगमणी ह. भ. प. श्री. व्यंकटेश महाराज फड मृदंग वाजवणार आहेत. तर, गायनाचार्य ह. भ. प. श्री. ओंकार महाराज जगताप, आळंदी, ह. भ. प. श्री. सदानंद महाराज कडूळे आळंदी, ह. भ. प. गुरुवर्य श्री. मधुकर महाराज सानप परभणी यांची गायनाची साथ राहणार आहे.
![](https://baramatizatka.com/wp-content/uploads/2025/02/WhatsApp-Image-2025-02-11-at-2.57.14-PM-639x1024.jpeg)
तरी मित्रपरिवार व नातेवाईक यांनी उपस्थित रहावे असे समस्त गोरे परिवार यांच्या वतीने नम्र आवाहन करण्यात येत आहे.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.