“दो हंसो का जोडा” बाजीराव काटकर व नितीन निगडे या जोडगोळीने गावातील सर्वसामान्य व सुज्ञ मतदार जोडला.

धर्मपुरी ग्रामपंचायत निवडणूक 2023 निवडणुकीत बहुजन ग्रामविकास आघाडीचा धुमधडाक्यात प्रचार शुभारंभ करून होम टू होम प्रचार सुरू
धर्मपुरी (बारामती झटका)
भारतीय जनता पक्षाचे विद्यमान सोलापूर जिल्हा उपाध्यक्ष व माळशिरस तालुका अध्यक्ष धर्मपुरी गावचे आदर्श सरपंच बाजीराव काटकर व धर्मपुरी गावचे कर्तव्यदक्ष माजी सरपंच नितीन निगडे यांनी सर्व जाती धर्मातील नेते, कार्यकर्ते व मतदार यांना विश्वासात घेऊन ग्रामपंचायत पंचवार्षिक निवडणुकीत बहुजन ग्रामविकास पॅनलची स्थापना करून थेट जनतेतील सरपंच व ग्रामपंचायत सदस्य यांच्या प्रचाराचा शुभारंभ मोठ्या थाटामाटात व उत्साही वातावरणात करून मतदारांपर्यंत होम टू होम प्रचार सुरू आहे.

बाजीराव काटकर व नितीन निगडे स्वतःच्या स्वार्थासाठी नाही तर जनतेसाठी एकत्र आलेले आहेत. “दो हंसो का जोडा” या जोडगोळीने गावातील सर्वसामान्य व सुज्ञ मतदार दिवसेंदिवस जोडला जात आहे. बहुजन ग्रामविकास आघाडीला मतदारांचा उदंड प्रतिसाद मिळून वाढता पाठिंबा मिळत आहे.
धर्मपुरी ता. माळशिरस ग्रामपंचायतीच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी थेट जनतेतील सरपंच पदाच्या अधिकृत उमेदवार सौ. झेंडे निता नवनाथ या असून त्यांचे चिन्ह कपबशी आहे.

प्रभाग क्र. १ मध्ये निगडे नितीन नामदेव – छत्री, सौ. कर्चे पुष्पा देविदास – छताचा पंखा, सौ. सपकाळ मोहिनी जयवंत – बस, प्रभाग क. २ मधून मसुगडे बाबासाहेब दत्तू – छत्री, सौ. मसुगडे आशा तात्या – छताचा पंखा, सौ. कुंभार जिजाबाई महादेव – बस, प्रभाग क्र. ३ मधून शिंदे भाऊसो चंद्रकांत – छत्री, सौ. कर्णे रेश्मा तानाजी – छताचा पंखा, प्रभाग क्र. ४ मधून काटकर मनोहर तुकाराम – छत्री, सौ. झेंडे स्वाती दादा – छताचा पंखा, प्रभाग क्र. ५ मधून पाटील संतोष मुरलीधर – छत्री, डबडे भारत तुकाराम – छताचा पंखा, माने अर्चना रामदास – बस असे अधिकृत उमेदवार व त्यांची चिन्हे आहेत.
बाजीराव काटकर यांनी गेल्या पाच वर्षांमध्ये अनेक प्रलंबित कामे करून गावचा विकास केलेला आहे. उर्वरित कामांसाठी त्यांना केंद्रातील व राज्यातील भाजपच्या विचाराच्या सरकारचा फायदा होणार आहे. माढा लोकसभेचे कार्यतत्पर व पाणीदार खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर, विधान परिषदेचे युवा आमदार रणजीतसिंह मोहिते पाटील, भारतीय जनता युवा मोर्चाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष माळशिरस विधानसभेचे लोकप्रिय दमदार आमदार राम सातपुते, सोलापूर जिल्हा नियोजन समितीवर भाजप व मित्र पक्षांचे सदस्य आहेत. जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या माध्यमातून गावामध्ये विकासकामे करण्याकरिता फायदा होणार आहे.


बहुजन ग्रामविकास आघाडी पॅनल तयार करीत असताना सर्व जाती धर्मातील लोकांना विश्वासात घेऊन गावातील ज्येष्ठ मंडळी व माजी सरपंच नितीन निगडे यांच्या सहकार्यातून पॅनल उभा केलेला आहे.
थेट जनतेतील सरपंच व ग्रामपंचायत सदस्यांची पंचवार्षिक निवडणूक रविवार दि. ५/११/२०२३ रोजी सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० या वेळेत जिल्हा परिषद शाळा, धर्मपुरी (बाजारपटांगण) येथे होणार आहे.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.