प्रितमसिंह देवकाते पाटील यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा होणार…

माळशिरस तालुक्याचे ज्येष्ठ व्यक्तीमत्व स्वर्गीय शिवाजीराव पाटील यांच्या विचारांचा वसा व वारसा जपणारे युवा नेतृत्व प्रितमसिंह देवकाते पाटील यांची उद्योग, व्यवसाय, सामाजिक, राजकीय जडणघडण..
माळशिरस (बारामती झटका)
माळशिरस तालुक्याचे ज्येष्ठ व्यक्तिमत्व स्वर्गीय शिवाजीराव पाटील उर्फ शिवाजीभाऊ यांच्या विचारांचा वसा व वारसा जपत उद्योग, व्यवसाय, सामाजिक, राजकीय जडणघडणीत अग्रेसर असणारे युवा नेतृत्व श्री. प्रितमसिंह साधनादेवी काशिनाथ देवकाते पाटील यांचा 41 वा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमांनी दि. 17 जानेवारी 2026 रोजी साजरा होणार आहे.
यामध्ये सर्वसामान्य व गोरगरीब गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य व खाऊवाटप करण्यात येणार आहे. माळशिरस येथील बेघर वस्तीगृहातील लोकांना पंचपक्वानाचे मिष्ठान्न भोजन देण्यात येणार आहे. पर्यावरणाचा समतोल राखण्याकरता मल्हार साखर कारखाना चांदापूरी कारखाना स्थळावर उपस्थित अधिकारी व कर्मचारी यांच्या वतीने वृक्षारोपण करण्यात येणार आहे. माळशिरस पंचक्रोशीतील पत्रकारांचाही सन्मान करण्यात येणार आहे. अशा विविध सामाजिक उपक्रमांनी युवा उद्योजक प्रितमसिंह देवकाते पाटील यांचा वाढदिवस साजरा होणार आहे.

माळशिरस तालुक्याचे ज्येष्ठ व्यक्तीमत्व स्वर्गीय शिवाजीराव पाटील उर्फ शिवाजीभाऊ यांच्या ज्येष्ठ कन्या सौ. साधनादेवी यांचा जलसंपदा विभागातील सेवानिवृत्त कार्यकारी अभियंता तथा मल्हार साखर कारखान्याचे चेअरमन काशिनाथ देवकाते पाटील यांच्याशी झालेला होता. सौ. साधनादेवी व श्री. काशिनाथ देवकाते पाटील यांना प्रितमसिंह यांच्या रूपाने पहिले पुत्ररत्न झाले. उभयदांपत्यांना प्रीतमसिंह, हिमालय, शंभुराजे अशी तीन पुत्ररत्न आहेत. त्यापैकी हिमालय साहेब इन्कम टॅक्स भारत सरकार मुंबई येथे आयुक्त आहेत..
युवा उद्योजक प्रितमसिंह देवकाते पाटील यांचं ग्रॅज्युएशन पुणे येथील फर्ग्युसन कॉलेजमध्ये झालेले आहे. त्यांचा विवाह लातूर येथील राजे हाके घराण्यातील राजकन्या श्वेता यांच्याशी एप्रिल 2012 मध्ये झालेला आहे. त्यांना दिव्याराजे कन्यारत्न व शिवेंद्रराजे पुत्ररत्न आहेत.

सौ. साधनादेवी व श्री. काशिनाथ देवकाते पाटील यांनी आपल्या मुलांवर चांगले संस्कार केलेले आहेत. आई-वडिलांच्या संस्कारावर तिन्ही मुलांनी आपल्या कर्तुत्वाने समाजामध्ये वेगळे स्थान निर्माण केलेले आहे.

पुण्यामध्ये जरी शिक्षण झालेले असले तरीसुद्धा ग्रामीण भागाशी नाळ देवकाते पाटील परिवार यांनी कधीही तुटून दिलेली नाही. चांदापुरी येथे मल्हार साखर कारखान्याची उभारणी अंतिम टप्प्यात आलेली आहे. आपण समाजाचे काहीतरी देणे लागतो, या उदात्त हेतूने देवकाते पाटील परिवार यांचे माळशिरस पंचक्रोशीमध्ये सामाजिक व राजकीय काम सुरू असते.
युवा उद्योजक श्री. प्रितमसिंह देवकाते पाटील यांच्या वाढदिवसाचा सर्वसामान्य व गोरगरिबांना आधार व्हावा यासाठी विविध सामाजिक उपक्रमांनी वाढदिवस साजरा करणार असल्याचे देवकाते पाटील परिवार, मित्रपरिवार व नातेवाईक यांनी कार्यक्रमाचे आयोजन केलेले आहे…

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.



