प्रितमसिंह देवकाते पाटील यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमांनी उत्साहात संपन्न झाला.

माळशिरस (बारामती झटका)
माळशिरस तालुक्याचे ज्येष्ठ व्यक्तिमत्व स्वर्गीय शिवाजीराव पाटील उर्फ शिवाजीभाऊ यांच्या विचारांचा वसा व वारसा जपत उद्योग, व्यवसाय, सामाजिक, राजकीय जडणघडणीत अग्रेसर असणारे युवा नेतृत्व श्री. प्रितमसिंह साधनादेवी काशिनाथ देवकाते पाटील यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमांनी दि. 17 जानेवारी 2026 रोजी 41 वा वाढदिवस उत्साहात संपन्न झाला.


सर्वसामान्य व गोरगरीब गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य व खाऊवाटप करण्यात आले. माळशिरस नगरपंचायत हद्दीतील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वाघमोडे वस्ती, साठ फाटा पाटील वस्ती, चौगुले वस्ती येथील लहान मुलांना शालेय साहित्य व खाऊवाटप करण्यात आले.
यावेळेस अकलूज कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक व अहिल्यादेवी विकास सेवा संस्थेचे चेअरमन संदीप पाटील,, माळशिरस नगरपंचायतीचे माजी उपनगराध्यक्ष अजिनाथ वळकुंदे, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष नानासाहेब वाघमोडे, हरिभाऊ वाघमोडे युवा नेते सचिन वाघमोडे, दत्तात्रय गणपत वाघमोडे, नंदीवाले समाजाचे संघटक मारुती वाघमोडे, संजय झंजे, माजी ग्रामपंचायत सदस्य दत्तू वाघमोडे, शिवाजी वाघमोडे, विनोद वाघमोडे, अज्ञान टेळे, शिक्षक अमोल करचे, पुनम वाघमारे, दत्तात्रय जाधवर, राजश्री जाधवर, वैशाली महामुनी, साहेबराव रुपनवर आदींसह विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


पर्यावरणाचा समतोल राखण्याकरता मल्हार साखर कारखाना चांदापूरी कारखाना स्थळावर लोकप्रतिनिधी अधिकारी व कर्मचारी उपस्थित वृक्षारोपण करण्यात आले.

यावेळी ॲड. पांडुरंग पाटील, ज्योतीराम जाधव, कारखाना मार्केटिंग मॅनेजर ऋषिकेश इनामदार, ॲडमिन ऑफिसर नितीन लोंढे, अकाउंटंट अनिकेत गोपने, चीप इंजिनियर बापूराव ननवरे, इंजिनियर ओंकार कदम, स्टोअर क्लार्क आझाद सय्यद, सिक्युरिटी ऑफिसर बापूराव तरंगे, महाराष्ट्र सिक्युरिटी फोर्स व सोमनाथ काळे सिक्युरिटी अधिकारी आदी उपस्थित होते.

माळशिरस पंचक्रोशीतील पत्रकारांचाही सन्मान यावेळी करण्यात आला. अशा विविध सामाजिक उपक्रमाने उत्साहात युवा उद्योजक प्रितमसिंह देवकाते पाटील यांचा वाढदिवस साजरा झाला आहे. दिवसभर मित्रपरिवार नातेवाईक यांनी समक्ष भेटून व फेसबुक, व्हाट्सअप द्वारे शुभेच्छांचा वर्षाव केलेला होता.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.



