ताज्या बातम्या

माजी सरपंच शिवतेजसिंह मोहिते पाटील यांनी तांबोळी परिवाराचे केले सांत्वन

अकलूज (बारामती झटका)

अकलूज ता. माळशिरस येथील विजय चौक येथील दर्गाह मशिदचे अध्यक्ष व जेष्ठ समाजसेवक अलहाज हारुणचाचा अहमदभाई तांबोळी यांचे अल्पशा आजाराने निधन झाले असून अकलूज ग्रामपंचायतीचे माजी सरपंच शिवतेजसिंह मोहिते पाटील यांनी तांबोळी कुटुंबास भेट सांत्वनपर भेट दिली. समाज सेवेसाठी सतत झटणारा सच्चा कार्यकर्ता हरपला असून त्यांनी समाजासाठी बहुमोल कार्य केले आहे. येत्या काळात त्याची उणीव भासणार आहे, अशी प्रतिक्रिया त्यांनी बोलून दाखवली.

यावेळी अझर तांबोळी, हाजी हुमायून तांबोळी ही मुले व अल फतहा मस्जिदचे अध्यक्ष हाजी आदमभाई तांबोळी, शौकत तांबोळी, तन्वीर तांबोळी, इनुस शेख, तन्वीर मनीयार, नजीर तांबोळी, पत्रकार शकूर तांबोळी यांचेसह तांबोळी कुटुंबातील सदस्य उपस्थित होते.

अलहाज हाजी हारुनभाई अहमदभाई तांबोळी यांनी जय संग्राम गृहसंकूल येथे गोरगरिबांना अल्प दरात जागा उपलब्ध करून दिली, सलग १० वर्षे सामुदायिक विवाह सोहळे आयोजित करून प्रत्येक मुलीच्या आईस १५,००० हजाराचे सरकारी अनुदान मिळवून देऊन आजपर्यंत त्यांनी २१४ वधुवरांची लग्न लावून देऊन सहकार्य केले. तसेच कोरोना काळात धान्याचे किट वाटून वेळोवेळी गरिबांना मदत केली. ऐतिहासिक हजरत राजबाग सवार बाबा दर्ग्याचे नूतनीकरण करण्यास विशेष प्रयत्न करून काम पूर्ण केले. विजय चौक येथील मस्जिदचे २९ वर्षे अध्यक्ष होते. गोरगरीब महिलांना सणाला साडी वाटप केले. हाजी हाफिज फतेह मोहम्मद ज्योतपुरी बाबा मदरसा (मुसलमानवाडी) चे विश्वस्त होते. आषाढीवारीसाठी येणाऱ्या वारकऱ्यांना घरी अन्नदानाची परंपरा आजही कायम ठेवली आहे. शंकरराव मोहिते पाटील टपरी संघटना जुना स्टँडचे अध्यक्ष होते. असे अनेक सामाजिक कार्य त्यांनी केले असून आज त्यांच्या जाण्यामुळे समाजातून हळहळ व्यक्त होत आहे.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Related Articles

Leave a Reply

Back to top button