प्रिया तोरणे धांडोरे यांचा नृत्यात जिल्ह्यात प्रथम क्रमांक

सोलापूर (बारामती झटका)
सोलापूर जिल्हा परिषद कर्मचारी सांस्कृतिक स्पर्धेत जि. प. प्रा. शाळा वाघडोहवस्ती शाळेच्या मुख्याध्यापिका प्रिया तोरणे धांडोरे यांनी पारंपरिक नृत्य प्रकारात प्रथम क्रमांक पटकावला.
जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी प्रतिवर्षी सोलापूर जिल्हा परिषद कर्मचारी सांस्कृतिक व क्रीडा स्पर्धा आयोजित करते. यामध्ये शिक्षण, आरोग्य, मुख्यालय यासह सर्व विभागाचे कर्मचारी सहभागी होतात.
अत्यंत चुरशीच्या झालेल्या पारंपरिक नृत्य प्रकारात माळशिरस पंचायत समितीच्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, वाघडोहवस्ती शाळेच्या मुख्याध्यापिका प्रिया तोरणे धांडोरे यांनी वैयक्तिक पारंपरिक नृत्य प्रकारात चंदन कांबळे यांच्या केसामध्ये गंगावन व राधा खुडे यांच्या मला पहायचं तुळजापूर या गाण्यावर नृत्य सादर केले.
पंचायत समिती माळशिरसने सादर केलेल्या पारंपरिक समूहनृत्य प्रकाराचाही जिल्ह्यात प्रथम क्रमांक आला. यात त्यांचा सहभाग होता. माळशिरस पंचायत समिती सांस्कृतिक टीमने सर्वसाधारण उपविजेते पद मिळवले. टीममध्येही त्या सहभागी होत्या. मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम, उपमुख्य कार्यकारी अधिकारी स्मिता पाटील, शिक्षण अधिकारी कादर शेख, विस्तार अधिकारी सुषमा महामुनी यांचे हस्ते त्यांचा सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देवून सन्मान करण्यात आला. त्यांना नृत्यदिग्दर्शक मनोज जगताप व प्रताप थोरात यांचे मार्गदर्शन लाभले. त्यांच्या यशाबद्दल गटविकास अधिकारी आबासाहेब पवार गटशिक्षणाधिकारी प्रदीप करडे, विस्तार अधिकारी सुषमा महामुनी, केंद्रप्रमुख राजेंद्र सुरवसे, केंद्रीय मुख्याध्यापिका रुक्मिणी पारसे, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष अंकुश फाटे यांनी त्यांचे अभिनंदन केले.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.