ताज्या बातम्याराजकारण

पुणे लोकसभा मतदारसंघात भाजपकडून उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडवणीस यांच्या नावाची चर्चा.

भारतीय जनता पक्षाच्या वरिष्ठ केंद्रीय पातळीवरून हालचाली वाढल्या, मतदार संघात चाचपणी सुरू

पुणे (बारामती झटका)

देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांची पंतप्रधान पदाची हॅट्रिक करणार असल्याने महाराष्ट्रातील 48 लोकसभा मतदार संघात जास्तीत जास्त खासदार निवडून आणण्याच्या भारतीय जनता पक्ष व मित्र पक्षामध्ये हालचाली सुरू आहेत. पुणे लोकसभा मतदार संघात भारतीय जनता पक्षाकडून अनेकजण इच्छुक असताना भारतीय जनता पक्षाच्या वरिष्ठ केंद्रीय पातळीवरून हालचाली वाढलेल्या आहेत. मतदार संघात महाराष्ट्र राज्याचे कर्तव्यदक्ष उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडवणीस यांच्या नावाची चर्चा सुरू झालेली आहे.

पुणे लोकसभा मतदार संघात गेल्या पाच निवडणुकांमध्ये 1999 प्रदीप रावत भाजप, 2004 सुरेश कलमाडी काँग्रेस, 2009 सुरेश कलमाडी काँग्रेस, 2014 अनिल शिरोळे भाजप, 2019 गिरीश बापट भाजप असे पुणे लोकसभेचे खासदार होऊन गेलेले आहेत. विद्यमान खासदार गिरीश बापट यांचे दुःखद निधन झालेले आहे. त्यांच्या जागी पुणे लोकसभा मतदारसंघाचा उमेदवार कोण असणार, याकडे लक्ष लागलेले आहे. भाजपकडून लोकसभा लढण्यासाठी जगदीश मुळीक, मुरलीधर मोहोळ, संजय काकडे, स्वारदा बापट, सुनील देवधर, माधुरी मिसाळ यांची नावे सध्या चर्चेत आहेत.

पक्षश्रेष्ठी दिल्लीतून उमेदवारी ज्यांना देतील त्यांच्यासाठी संपूर्ण भारतीय पक्ष जनता पक्षाचे कार्यकर्ते, नेते नगरसेवक, आमदार काम करतील. विजय हा भारतीय जनता पक्षाचाच होईल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. मात्र, अचानक उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडवणीस यांच्या नावाच्या चर्चेला वरिष्ठ पातळीवरून हालचाली सुरू झाल्याचे खात्रीलायक वृत्त आहे.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button