ताज्या बातम्यासामाजिक

पुणे–पंढरपूर हायवेवर घातक स्लजची बिनधास्त वाहतूक; दी न्यू फलटण शुगर डिस्टिलरीच्या पर्यावरण नियमभंगाकडे MPCBचे दुर्लक्ष?

महाराष्ट्र पोल्युशन कंट्रोल बोर्ड (MPCB) कडे वसीम इनामदार यांची ई-मेल द्वारे तक्रार दाखल

एमपीसीबीच्या ऑफिसला प्रत्यक्ष भेट देऊन तक्रार दाखल करणार!

काळज (बारामती झटका)

पुणे–पंढरपूर राष्ट्रीय महामार्गावरून दी न्यू फलटण शुगर प्रायव्हेट लिमिटेड, डिस्टिलरी डिव्हिजन सुरवडी कडून घातक स्लजची वाहतूक सुरू असल्याचा गंभीर प्रकार समोर आला असून, ही वाहतूक पर्यावरणीय नियम धाब्यावर बसवून केली जात असल्याचे धक्कादायक वास्तव उघड झाले आहे.

डिस्टिलरी प्लांटमधून निर्माण होणारा स्लज हा Hazardous and Other Wastes (Management & Transboundary Movement) Rules, 2016 अंतर्गत स्पष्टपणे घातक कचरा म्हणून वर्गीकृत आहे. मात्र प्रत्यक्षात हा स्लज गळती होणाऱ्या वाहनांतून, कोणतीही पुरेशी सुरक्षितता न पाळता, थेट पुणे–पंढरपूरसारख्या वर्दळीच्या महामार्गावरून वाहून नेला जात आहे.

रस्त्यावर सांडलेला स्लज, अपघातांचा धोका
या स्लज वाहतुकीदरम्यान अनेक ठिकाणी काळसर, दुर्गंधीयुक्त स्लज रस्त्यावर सांडलेला आढळून आला आहे. परिणामी दुचाकीस्वार घसरून पडण्याचा धोका, चारचाकी वाहनांचे अपघात तसेच वाहनचालकांच्या आरोग्याला गंभीर धोका निर्माण झाला आहे. स्थानिक नागरिकांच्या मते, काही ठिकाणी तर स्लज सांडल्याने हायवेवर दुर्गंधीचे साम्राज्य पसरले आहे.

नियम काय सांगतात ?
नियमानुसार, स्लज वाहतूक फक्त MPCB-मान्यताप्राप्त ट्रान्सपोर्टरकडून
पूर्णपणे बंद व गळतीरोधक वाहनातून वाहनावर Hazardous Waste चे स्पष्ट लेबल प्रत्येक फेरीसाठी Manifest (Form-10) व Emergency Information (Form-9) तसेच Motor Vehicles Act, 1988 मधील घातक पदार्थ वाहतुकीच्या नियमांचे पालन
करणे बंधनकारक आहे.
मात्र प्रत्यक्ष परिस्थिती पाहता, या पैकी अनेक अटींचे उल्लंघन होत असल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत.

पर्यावरण व शेतीला मोठा धोका
तज्ज्ञांच्या मते, असा स्लज रस्त्यावर सांडल्यास तो पावसाच्या पाण्यात मिसळून माती, शेती, नाले व भूजल प्रदूषित करू शकतो. पुणे–पंढरपूर पट्ट्यातील शेती व वस्ती यावर याचे दूरगामी दुष्परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

MPCB ची भूमिका संशयाच्या भोवऱ्यात
इतक्या गंभीर प्रकारानंतरही Maharashtra प्रदूषण नियंत्रण मंडळाने (MPCB) अद्याप ठोस कारवाई न केल्याने प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.
👉सदर वाहतुकीसाठी योग्य परवानग्या आहेत का ?
👉ट्रान्सपोर्टर अधिकृत आहे का ?
👉स्लज नेमका कुठे व कशासाठी नेला जात आहे ?
हे सर्व प्रश्न अद्याप अनुत्तरित आहेत.

यामुळे सामाजिक कार्यकर्ते वसीम इनामदार यांनी या प्रकरणाची तत्काळ उच्चस्तरीय चौकशी करून:
स्लज वाहतूक त्वरित थांबवावी, दोषींवर दंडात्मक कारवाई व प्लांटवर कारवाई करावी अशी जोरदार मागणी ईमेल द्वारे केली आहे व लवकरच प्रत्यक्ष ऑफिसला भेट देऊन तक्रार दाखल करणार आहे.

पुणे–पंढरपूर हायवेवर सुरू असलेली ही घातक स्लज वाहतूक म्हणजे मानवी आरोग्य, पर्यावरण व कायद्याशी थेट खेळ असल्याची भावना नागरिकांतून व्यक्त होत असून, आता प्रशासन याकडे गांभीर्याने पाहणार का, हाच खरा प्रश्न आहे.
त्यामुळे न्यू फलटण शुगर प्रायव्हेट लिमिटेड डिस्टिलरी डिव्हिजन कंपनी विरोधात महाराष्ट्र पोल्युशन कंट्रोल बोर्ड (MPCB) कडे इमेल द्वारे तक्रार दाखल केल्यानंतर प्रत्यक्ष ऑफिसला भेट देऊन तक्रार दाखल करणार आहे. असे सामाजिक कार्यकर्ते वसीम इनामदार यांनी सांगितले.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.

Related Articles

Back to top button
marsbahis hacklink market casibom