पुणे येथील राज्यस्तरीय उल्लास मेळाव्यात रत्नागिरीचे शिक्षणाधिकारी किरण लोहार यांचा सन्मान
पुणे (बारामती झटका)
‘जन जन साक्षरता ‘या संकल्पनेतून केंद्र शासनाने हाती घेतलेल्या नवभारत साक्षरता कार्यक्रमाची ठोस अंमलबजावणी रत्नागिरी जिल्ह्यात शिक्षणाधिकारी योजना श्री. किरण लोहार यांनी केली. वय वर्षे १५ ते त्यापुढील वयोगटातील निरक्षर लोकांना (असाक्षर) पायाभूत साक्षरता, संख्यज्ञान, जीवन कौशल्य विकसित करण्यासाठी स्वयंसेवक, शिक्षक, विद्यार्थी यांना उचित मार्गदर्शन करत स्वतः पुढाकार घेऊन काम केले.
त्याचबरोबर पुणे येथील रत्नागिरी जिल्ह्याची स्टॉल मांडणी पाहून श्री. महेश पालकर संचालक (योजना), राजेश क्षीरसागर उपसंचालक (योजना) पुणे यांनी भेट देऊन तयारी पाहून समाधान व्यक्त केले. रत्नागिरी जिल्ह्याने केलेल्या अतिउत्कृष्ट कामकाजाबद्दल रविवार दि. २९ सप्टेंबर २०२४ रोजी राज्यस्तर नवभारत साक्षरता मेळावा, एससीआरटी पुणे येथे उत्साहात संपन्न झाला.
डॉ. किरण लोहार शिक्षणाधिकारी (योजना) यांच्या या सेवेचा सन्मान शिक्षण मंत्री नामदार श्री. दिपक केसरकर यांचे शुभ हस्ते करण्यात आला. याप्रसंगी केंद्रीय सचिव अर्चना शर्मा, प्रधान सचिव आय ए कुंदन, शिक्षण आयुक्त सूरज मांढरे, राज्य प्रकल्प संचालक आर विमला, संचालक श्री. राहुल रेखा राव, शिक्षण संचालक शरद गोसावी, संचालक कृष्णकुमार पाटील, शिक्षण संचालक माध्यमिक व उच्च माध्यमिक संपत सुर्यवंशी, अध्यक्ष महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद नंदकुमार बेडसे, शिक्षण संचालनालय (योजना) महाराष्ट्र राज्य डॉ. महेश पालकर या मान्यवरांची उपस्थिती होती. उत्कृष्ट केलेल्या कामाबद्दल किरण लोहार यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
प्रेरणा न मार्गदर्शन -1. ना. उदय सामंत, पालकमंत्री ,2. मा. एम देवेंदरसिंह, जिल्हाधिकारी, मा. कीर्ती किरण पुजार, मुख्य कार्यकारी अधिकारी
योगदान -1. सर्व स्टाफ योजना विभाग, 2. सर्व गट शिक्षणाधिकारी, विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुख, शिक्षक संघटना, शिक्षक डाएट प्राचार्य व स्टाफ
सर्व नवसाक्षर, स्वयंसेवक यांनी अतिशय मन लावून केलेले काम, रत्नागिरी जिल्ह्याने दिलेल्या उद्दिष्टच्या २००% हुन अधिक केलेले काम, त्यातील सातत्य यामूळे ३५ मंजूर स्टाफ पैकी फक्त्त, ३ जण कार्यरत असताना हे यश मिळवू शकलो यांचा खूप अभिमान वाटतो. – मा. संचालक, पालकर साहेब, उपसंचालक क्षीरसागर साहेब व राज्य योजना विभाग यांचे अनमोल असे सातत्यपूर्ण मार्गदर्शन लाभले.
अनिल देशपांडे बार्शी
९४२३३३२२३३
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.