पुणेचे सत्यशोधक रघुनाथ ढोक भारतीय संविधान सन्मान राष्ट्रीय गौरव पुरस्काराने झाले सन्मानित !!!

चंद्रपूर/भद्रावती (बारामती झटका)
पुणे येथील फुले शाहू आंबेडकर एज्युकेशनल अँड सोशल फौंडेशनचे अध्यक्ष व महात्मा फुले चरित्र साधने साहित्य व प्रकाशन समिती, महाराष्ट्र शासनाचे सदस्य सत्यशोधक रघुनाथ ढोक यांनी साहित्य व सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केली म्हणुन त्यांचा रविवार दि. 28 डिसेंबर 2025 रोजी तथागत बुद्धविहार नविन सुमठाना, भद्रावती, चंद्रपूर येथे भारतीय संविधान दिन व डॉ. आंबेडकर महापरिनिर्वाण दिनप्रित्यर्थ “भारतीय संविधान सन्मान-राष्ट्रीय गौरव पुरस्कार 2025” ने दुपारी 2 वाजता सन्मानपत्र आणि मोमेंटो, शाल, श्रीफळ मान्यवरांचे शुभहस्ते देऊन गौरव करण्यात आला.
या सोहळयाचे आयोजन भारतीय संविधान सन्मान समारोह समिती, मौलिक अधिकार संघर्ष समिती आणि ह्युमन राईट्स असोसिएशन ऑफ इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून मा. प्रविण चिमुरकर, स्वागताध्यक्ष मा. मनोजभाऊ मोडक, मार्गदर्शक जेष्ठ साहित्यिक मधुकररावजी बावलकर (तेलंगाना), रविंद्र चिवडे, ब्रीजभूषण पाझारे उपस्थितीत होते.
याप्रसंगी ॲड. पूनम वाघमारे हिने अत्यंत सोप्या भाषेत संविधान समजून सांगताना बाबासाहेबांनी आपल्यासाठी किती मोठे योगदान देऊन संविधान निर्मिती केली, सोबतच त्यामध्ये महिलांसाठी अनेक बाबतीत कशी मदत केली, याविषयी मौलिक मार्गदर्शन केले.
यावेळी सत्कारास उत्तर देताना सत्यशोधक ढोक म्हणाले की, गेल्या पाच वर्षांत पूर्णपणे मोफत महाराष्ट्र व तेलंगणात एकूण 54 सत्यशोधक विवाह व 15 वास्तू / गृहप्रवेश विधी पार पाडले. तसेच विविध सामाजिक, शैक्षणिक, सहकार क्षेत्रांत कार्यरत राहून ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले, महात्मा फुले गीतचरित्र आदी महत्त्वपूर्ण पुस्तकेही वेगवेगळ्या भाषेत प्रकाशित केली आहेत. आणि अनेक विवाह प्रसंगी वधू वर मान्यवरांना फुले दाम्पत्य फोटो फ्रेम सोबत संविधान भेट देत असतानाच नुकतेच अमृत महोत्सवी संविधान दिनी सांगली येथे उच्चशिक्षित वधुवर यांचा 75 संविधान प्रती व संत रोहिदास ग्रंथ वाटप करून विवाह लावला. या सर्व कार्याची दखल घेऊनच माझी या पुरस्कारासाठी निवड झाल्याचे वाटते. ह्या समाजकार्याची ज्योत अखंड पेटत ठेवण्यासाठी आपले असेच आशीर्वाद मिळत राहो असे देखील ढोक म्हणाले.
या पुरस्कारावेळी जेष्ठ समाजसेवक शिवदास महाजन (पुणे) आणि प्रा. सुकुमार पेटकुले (तेलंगाना) व अभिनेत्री गायत्री रामटेके, कवी नागनाथ डोलारे, शाहीर तुकाराम जाधव आदी मान्यवरांचा देखील सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाचे आयोजक वामन दुर्योधन व समितीचे अध्यक्ष निलेश पाटील, सचिव आनंद भगत, गौरव शेळके, कोषाध्यक्ष भीमराव लोखंडे यांनी या कार्यक्रमासाठी मोलाची मेहनत घेऊन कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडल्याबद्ल सर्वांनी त्यांचे कौतुक केले.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.



