पुण्यामध्ये हिंदू खाटीक समाजाला आर्थिक विकास महामंडळाची मंजुरी दिल्याबद्दल विजयी महामेळावा व समाजभूषण पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन

पुणे (बारामती झटका)
महाराष्ट्र शासनातर्फे महायुती सरकारच्या वतीने हिंदू खाटीक समाजाला आर्थिक विकास महामंडळाची मंजुरी दिल्याबद्दल अखिल भारतीय हिंदू खाटीक समाजाच्या वतीने विजयी महामेळावा तसेच समाजभूषण पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन गुरुवार दि. १७ ऑक्टोबर २०१४ रोजी दुपारी १ वाजता लक्ष्मी बाजार, सांस्कृतिक भवन, भवानी पेठ, पुणे येथे करण्यात आले आहे. सदरचा कार्यक्रम उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, भाजपचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, आमदार रवींद्र धंगेकर, माजी खासदार शिवाजीराव कांबळे, विधान परिषदेचे आमदार कृपाल तुमाने, अनुसूचित जाती जमातीचे पूर्व सदस्य सुभाष पारधी, माजी आमदार राजू पारवे आणि माजी आमदार सुधीर पारवे यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि भारतीय हिंदू खाटीक समाजाचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार भोलासिंह बडगुजर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होणार आहे. यावेळी अरुणजी गोविंदजी घोलप आणि विजयराव प्रभाकरराव गालिंदे यांचा सत्कार करण्यात येणार आहे.
तसेच यावेळी राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष नानक राजौरा, मुख्य राष्ट्रीय संरक्षक हरबंस राजौरा, राष्ट्रीय प्रधान संरक्षक विश्वनाथ गोतरकर, राष्ट्रीय कार्याध्यक्ष विश्राम पवार, राष्ट्रीय वरिष्ठ उपाध्यक्ष विजयराव गालिंदे, राष्ट्रीय महासचिव हिरामण क्षीरसागर, राष्ट्रीय वरिष्ठ उपाध्यक्ष अरुण घोलप, राष्ट्रीय महासचिव मनीराम पवार, राष्ट्रीय महासचिव (प्रचार प्रसार) गौतम बागोरिया, राष्ट्रीय महासचिव भवानीशंकर नारानिया, राष्ट्रीय महासचिव राजेश सोनकर, राष्ट्रीय महासचिव दिनेश आशिवाल, राष्ट्रीय महासचिव अशोक कल्याणकर, राष्ट्रीय महासचिव प्रशांत मुरारीकर, केंद्रीय देखरेख समिती सदस्य धर्मेंद्र सोनकर, राष्ट्रीय महासचिव जयकिशन राव, राष्ट्रीय महासचिव संतोष हिंगोलेकर, राष्ट्रीय प्रधान महासचिव सिप्पी महेंद्रा आदी राष्ट्रीय पदाधिकाऱ्यांसह प्रदेशाध्यक्ष प्रवीणराव गालिंदे, महिला प्रदेशाध्यक्षा सौ. शितलताई इंगवले, प्रदेश कार्याध्यक्ष चंदूभाऊ गोतरकर, प्रदेश कार्याध्यक्ष विशाल कांबळे, प्रदेश उपाध्यक्ष शशिकांत शेटके, प्रदेश सचिव मनोहर हरणे, प्रदेश सचिव सागर गायकवाड, प्रदेश उपाध्यक्षा सौ. स्मिताताई दुर्गे, मीडिया प्रमुख मनोज गालिंदे, प्रदेश उपाध्यक्ष योगेश गोतरकर, युवा राष्ट्रीय उपाध्यक्ष अमोल खिराडकर आदी राज्यस्तरीय पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.

त्याचबरोबर छगनराव पारडे, बाळासाहेब मांडवे, संतोष माकोडे, लक्ष्मण मांजरे, विनोद घनकर, अमोल माकोडे, अनंत गोतरकर, संजयराव खडके, शाम तेरकर, संजय कल्याणकर, बाबुराव हिवराळे, अभिजीत धाकपडे, सोमनाथराव खडके, सौ. रुपाली घोलपे, डॉ. सुवर्णा घोणे, अविनाशराव जाधव, नंदकुमार गालिंदे, लक्ष्मण भोकरे, सौ. शिल्पा पलंगे, सौ. सुप्रिया लांडगे, सौ. कविता कल्याणकर, सौ अलकाताई इंगवले, सौ. इंदुताई येललकार, सौ. पूजा लाड आदी जिल्हाध्यक्ष उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमाचे स्वागतोत्सुक पुणे जिल्हा प्रमुख दिलीप गालिंदे, पुणे शहर प्रमुख अनिल घोडके, पिंपरी चिंचवड शहर प्रमुख नंदकुमार कांबळे, पुणे जिल्हा कार्याध्यक्ष विजय घोलप हे असणार आहे.
या कार्यक्रमासाठी पुणे शहर हिंदू खाटीक समाज विश्वस्त मंडळ, लक्ष्मी बाजार प्रतिष्ठान पुणे, अहिल्यादेवी तरुण मंडळ ट्रस्ट भवानी पेठ पुणे, हिंदू खाटीक प्रतिष्ठान पुणे, मल्हार एकता सामाजिक संस्था, संत गंगानाथ महाराज ट्रस्ट, रामजी बाबा प्रतिष्ठान, हिंदू खाटीक समाज येरवडा, पिंपरी चिंचवड हिंदू खाटीक चॅरिटेबल ट्रस्ट, क्षत्रिय मराठा धनगर (खाटीक) समाज आळंदी व पंढरपूर विश्वस्त मंडळ आणि समस्त हिंदू खाटीक समाज महाराष्ट्र राज्य यांचे विशेष सहकार्य असणार आहे. तरी या महा विजय मेळाव्यास व समान समाज भूषण पुरस्कार वितरण सोहळ्यात खाटीक हिंदू खाटीक समाज बांधवांनी उपस्थित राहण्याचे आवाहन अखिल भारतीय हिंदू खाटीक समाज महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने करण्यात आले आहे.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.