पुरंदावडे ग्रामपंचायतीची मासिक मिटींग नूतन ग्रामसेवक सुनील बोराटे यांच्या उपस्थितीत सुरू.
पुरंदावडे ग्रामस्थ यांच्या आमरण उपोषणामुळे जे. एम. दीक्षित ऐवजी पदावर सुनील बोराटे ग्रामपंचायतीमध्ये दाखल झाल्याने उलटसुलट चर्चा सुरू…
पुरंदावडे (बारामती झटका)
पुरंदावडे ता. माळशिरस, ग्रामपंचायतीच्या निकृष्ट कामांची चौकशी करून ग्रामसेविका जे. एम. दीक्षित मॅडम यांच्या कार्यकाळातील कारभाराची चौकशी करून दोषी असल्यास प्रशासकीय कारवाई करावी, यासाठी ग्रामस्थ संतोष ओवाळ व संघर्ष ओवाळ यांनी आमरण उपोषण ग्रामपंचायत कार्यालयासमोर केलेले होते. गावातील माजी सरपंच, विद्यमान ग्रामपंचायत सदस्य, माजी सदस्य आणि ग्रामस्थ यांनी पाठिंबा देऊन मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शविली होती.
उपोषण कर्ते यांची प्रकृती खालावल्यानंतर पंचायत समितीचे झोपलेले प्रशासन जागे होऊन पंचायत समितीमधील कर्मचारी व विस्तार अधिकारी यांनी उपोषण कर्ते यांना पत्र देऊन जे. एम. दीक्षित मॅडम यांच्याकडील पुरंदावडे ग्रामसेवक पदाचा पदभार कमी करून कामाची चौकशी करून दोषी आढळल्यास प्रशासकीय कारवाई केली जाईल, असे लेखी व तोंडी सांगितल्याने सदरचे उपोषण पाठीमागे घेतलेले होते. दोनच दिवसांनी पुरंदावडे ग्रामपंचायतीची मासिक मिटींग विद्यमान सरपंच सौ. राणी मोहिते व ग्रामपंचायत सदस्य यांच्या उपस्थितीत सुरू आहे.
सदरची मीटिंग ग्रामसेवक सुनील बोराटे यांच्या उपस्थितीत सुरू आहे. मासिक मिटींग सुरू असल्यामुळे सुनील बोराटे यांच्याशी संपर्क होऊ शकलेला नाही. मात्र, पुरंदावडे ग्रामपंचायतीच्या मासिक मिटींग साठी जे. एम. दीक्षित मॅडम ऐवजी सुनील बोराटे ग्रामपंचायत मध्ये दाखल होऊन मिटींग सुरू केलेली असल्याने उलटसुलट चर्चा सुरू झालेली आहे. उपोषणकर्ते यांच्या आंदोलनाला यश आले आहे का ? कि, दीक्षित मॅडम रजेवर असल्यामुळे त्यांच्याकडे पदभार आलेला आहे ?, याची संपूर्ण माहिती सुनील बोराटे यांच्याकडून मासिक मिटींग संपल्यानंतर मिळणार आहे.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.