ताज्या बातम्या

पुरंदावडे ग्रामपंचायतीच्या ग्रामसेवका यांची चौकशी होऊन कारवाई होण्यासाठी कार्यालयासमोर उपोषण होणार.

उपोषणस्थळी मंडप व स्पीकर परवानगी, शांतता व सुव्यवस्थेच्या दृष्टीने ग्रामपंचायत सरपंच यांनी नाकारली.

पुरंदावडे (बारामती झटका)

पुरंदावडे ता. माळशिरस या ग्रामपंचायतीच्या ग्रामसेविका यांची चौकशी होऊन कारवाई व्हावी, अन्यथा ग्रामपंचायत कार्यालयासमोर बेमुदत उपोषणास बसणार असल्याचे पत्र माळशिरस पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांना देऊन सदर पत्राच्या प्रती माळशिरस पोलीस स्टेशन व पुरंदावडे ग्रामपंचायत यांना दिलेले होते. सदरच्या उपोषणास संतोष प्रकाश ओवाळ व संघर्ष भगवान ओवाळ उपोषणास बसण्यासाठी मंडप व स्पीकरची परवानगी ग्रामपंचायतकडे मागितलेली होती. ग्रामपंचायतीचे सरपंच यांनी शांतता आणि सुव्यवस्थेच्यादृष्टीने सदरची परवानगी नाकारली आहे.

संतोष प्रकाश ओवाळ व संघर्ष भगवान ओवळ रा. पुरंदावडे, ता. माळशिरस, यांनी गटविकास अधिकारी यांना दिलेल्या अर्जामध्ये असे नमूद करण्यात आले आहे की, मौजे पुरंदावडे गावाच्या नागरिक या नात्याने कुठल्याही विकास कामाबाबतीत विचारणा करावयास गेलो असता ग्रामसेवक उद्धट भाषा वापरतात व समाधानकारक योग्य उत्तरे देत नाहीत. तसेच ग्रामसेवक महिला असल्याने सतत नागरिकांना केस करण्याची धमकी देतात. एका पार्टीची बाजू घेऊन दुसऱ्या पार्टीच्या लोकांची कामे जाणूनबुजून अडवली जात आहेत. अशा पद्धतीने त्यांचा मनमानी कारभार चाललेला असून यामुळे पुरंदावडे गावचे नागरिक त्रस्त झालेले आहेत.

त्यामुळे आम्ही आपणास विनंती करतो की, अशा हेकट व मनमानी कारभार करणाऱ्या ग्रामसेवकांची आपण सखोल चौकशी करून त्यांच्यावर कडक कारवाई करावी. अन्यथा दि. 26/10/2023 पासून ग्रामपंचायत कार्यालया समोर बेमुदत उपोषणास बसणार आहोत‌. त्यामुळे आपण त्यांच्यावर कडक कारवाई करून पुरंदावडे ग्रामस्थांना योग्य न्याय द्यावा, असे पत्र देऊन सदर पत्राच्या प्रति माहितीस्तव पोलीस निरीक्षक माळशिरस व ग्रामपंचायत पुरंदावडे यांना देण्यात आलेल्या आहेत.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आपल्या ग्रुपमध्ये बारामती झटका न्यूज संपादक श्रीनिवास कदम पाटील 9850104914 हा नंबर समाविष्ट करावा..

Related Articles

One Comment

  1. This was a fantastic read! The author did an excellent job presenting the information in an engaging way. I’m eager to hear different viewpoints on this. Check out my profile for more discussions.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button