पुरावे असलेल्यांना प्रमाणपत्र देण्यास आमचा नकार – जरांगे पाटील
आम्हाला अर्धवट नको सरसकट दाखले हवेत
अंतरवाली सराटी (बारामती झटका)
मला समाजापेक्षा कुणीही मोठे नाही, फक्त पुरावे असलेल्यांना प्रमाणपत्र देण्यास आमचा विरोध आहे. महाराष्ट्रातील सर्व मराठ्यांना आरक्षण मिळावे, सरसकट मराठ्यांना दाखले द्यावेत, आम्ही अर्धवट आरक्षण घेणार नाही, असा ठाम निर्धार मराठा आरक्षण योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी सोमवारी अंतरवाली सराटी येथे पत्रकार परिषदेत बोलून दाखविला.
दरम्यान, मुख्यमंत्र्यांनी मुंबईत चर्चेला बोलावल्याचे आमंत्रण जरांगे पाटील यांनी नाकारले आहे. ते म्हणाले की, मी आंदोलन थांबवणार नाही,, असे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांना फोनवरून सांगितले आहे. परंतु मराठा आंदोलकांच्या विनंतीचा मान राखत मी आज पाणी घेत आहे.
ते पुढे म्हणाले की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आरक्षणासाठी थोडा म्हणजे अजून किती वेळ हवा आहे, हे तरी कळू दे. आमच्या आंदोलनाचा तिसरा टप्पा सुरू व्हायचा आहे. १ नोव्हेंबरपासून आमच्या आंदोलनाचा तिसरा टप्पा सुरू होत आहे. राष्ट्रवादीचे आमदार प्रकाश सोळंके आता सोसायटीतही निवडून येणार नाहीत, असा दावा करून पोलिसांनी मराठा आंदोलकांना त्रास द्यायचे थांबवावे. मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या वाचाळ माणसांना आवर घालावा, आमच्या वाटेला गेला. तर मराठे सोडणार नाहीत, असा इशारा जरांगे पाटील यांनी दिला. आमच्या आंदोलनाला कुणी तरी गालबोट लावत आहे, असा आरोपही त्यांनी यावेळी केला.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.
Insightful read! I found your perspective very engaging. For more detailed information, visit: READ MORE. Eager to see what others have to say!