माळशिरस येथील कलावती सोपान वावरे यांचे दुःखद निधन….

सूर्यकांत सोपान वावरे यांच्या मातोश्री तर माळशिरस नगरपंचायतीचे मा. नगराध्यक्ष सचिन आप्पा वावरे यांच्या आजी होत्या..
माळशिरस (बारामती झटका)
माळशिरस येथील कलावती सोपान वावरे यांचे बुधवार दि. 03/12/2025 रोजी वयाच्या 85 व्या वर्षी अल्पशा आजाराने दुःखद निधन झालेले आहे. त्यांच्या पश्चात दोन मुले, दोन सुना, एक मुलगी, चार नातू, तीन नाती, परतवंडे असा परिवार आहे. सूर्यकांत सोपान वावरे यांच्या मातोश्री होत्या तर माळशिरस नगरपंचायतीचे मा. नगराध्यक्ष सचिनआप्पा वावरे यांच्या आजी होत्या. त्यांच्यावर 61 फाटा माळशिरस-अकलूज रोड येथील राहत्या निवासस्थाना शेजारील शेतामध्ये शोकाकुल वातावरणात अंतिम संस्कार करण्यात आलेले आहेत. त्यांचा रक्षा विसर्जन तिसऱ्याचा कार्यक्रम शुक्रवार दि. 05/12/2025 रोजी सकाळी 7.15 वाजता होणार आहे.
वावरे परिवार यांना दुःखातून सावरण्याचे ईश्वर बळ देवो व स्व. कलावती यांच्या आत्म्याला शांती लाभो हीच बारामती झटका परिवार यांचे कडून भावपूर्ण आदरांजली आहे.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.



