राजेंद्रकुमार गुंड यांना कृतिशील शिक्षक पुरस्कार जाहीर
माजी शिक्षक आमदार दत्तात्रय सावंत यांच्या हस्ते होणार वितरण
माढा (बारामती झटका)
माढा तालुक्यातील शासकीय अधिकारी व नोकरदारांचे गाव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या विठ्ठलवाडीचे रहिवासी व श्री विठ्ठल शिक्षण प्रसारक मंडळ निमगाव (टें.) या संस्थेत मागील 23 वर्षांपासून कार्यरत असणारे आदर्श शिक्षक राजेंद्रकुमार बाळू गुंड यांना महाराष्ट्र राज्य कृती समितीच्या वतीने दिला जाणारा सन 2024-25 चा जिल्हास्तरीय कृतिशील शिक्षक पुरस्कार जाहीर झाला असून निवडीचे पत्र पुणे विभागाचे माजी शिक्षक आमदार दत्तात्रय सावंत यांनी दिले आहे.
या पुरस्काराचे स्वरूप स्मृतिचिन्ह, प्रमाणपत्र, शाल, फेटा, श्रीफळ व पुष्पगुच्छ असे आहे. पुरस्काराचे वितरण रविवारी 8 डिसेंबर 2024 रोजी दुपारी 1 वाजता पंढरपूर तालुक्यातील कोर्टी येथील सिंहगड कॉलेजमध्ये माजी आमदार दत्तात्रय सावंत, कृती समितीचे समाधान घाडगे, दत्तात्रय ननवरे, नंदकुमार टोणपे, गणेश कोकाटे, बंडू जाधव, महावीर आखाडे, गजानन लावर यांच्यासह मान्यवरांच्या उपस्थितीत होणार आहे.
राजेंद्रकुमार गुंड यांनी मागील 23 वर्षांपासून सातत्याने शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य व योगदान दिले आहे. विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीसाठी प्रयत्न केले आहेत. त्यांचे अनेक विद्यार्थी दहावीच्या पुणे बोर्डाच्या परीक्षेत चमकले आहेत. त्यांनी विद्यार्थ्यांच्या अंगी असलेल्या सुप्त कलागुणांना वाव देण्यासाठी विद्यालयात शालेय व सहशालेय उपक्रम राबविले आहेत. विविध प्रकारच्या खाजगी व शासकीय स्पर्धा परीक्षांची तयारी ते विद्यार्थ्यांकडून करुन घेतात. एक विद्यार्थीप्रिय व हाडाचे शिक्षक म्हणून त्यांची ओळख निर्माण झाली आहे. त्यांना यापूर्वीही जिल्हा व राज्य पातळीवरील विविध पुरस्काराने सन्मानित केले आहे. हा पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल त्यांचे सर्व स्तरातून कौतुक व अभिनंदन होत आहे.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.
gluco6 reviews : https://gluco6reviews.usaloves.com/
gluco6 reviews : https://gluco6reviews.usaloves.com/
Blue Techker naturally like your web site however you need to take a look at the spelling on several of your posts. A number of them are rife with spelling problems and I find it very bothersome to tell the truth on the other hand I will surely come again again.