राज्य सरकारने बळीराजाला संपूर्ण कर्जमुक्त करावे, शिवस्वराज्य युवा संघटनेची मागणी
मुंबई (बारामती झटका)
दुष्काळ अतिवृष्टी अवकाळी पाऊस आणि दुसरीकडे शेतीमालाचे व दुधाचे पडलेल्या दरामुळे व केंद्र आणि राज्य सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे शेतकरी अडचणीत सापडला आहे. त्या थकबाकीदार शेतकऱ्यांना बँका नवीन कर्ज देत नाही. त्यामुळे राज्यातील अडचणीतील शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करावा. राज्याच्या मदत व पुनर्वसन विभाग आकडेवारीनुसार १ जानेवारी २०२३ ते २०२४ या १४ महिन्याच्या काळात ३,६८९ शेतकऱ्यांनी जगाचा निरोप घेतला आहे. त्यांचे प्रमुख कारण म्हणजे कर्जबाजारीपणा हेच आहे.
लागवड केलेले पीक ऐन हाताशी आल्यावर नैसर्गिक आपत्तीमुळे वाया जाण्याच्या संकटामुळे आणि शेतीमालाला रास्त भाव मिळत नसल्यामुळे बळीराजाला त्याच्या डोक्यावरील कर्ज फेडता आले नाही. पूर्वीचे कर्ज थकीत असल्याने बँकाकडून नवीन कर्ज मिळत नाही. दुसरीकडे बँकेत गेल्यावर नाही म्हटले तरी सिबिल पाहिलेच जाते, ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना खाजगी सावकारांचा दरवाजा ठोठावा लागत असून सावकाराने जमिनी बळकावण्याच्या तक्रारी देखील वाढल्या आहेत.
संकटातच्या चक्र व्यवहारातून बाहेर आणण्यासाठी शेतकऱ्यांचा सातबारा कोरा व्हायला पाहिजे. आज राज्य सरकारने अधिवेशनात त्याची घोषणा करावी. याकडे राज्यातील सव्वा कोटी शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे. तसेच कांदा निर्यातबंदी, पामतेल, सोयाबीन पेड, कापूस आयात, साखरेवरील निर्यातबंदी अशा केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे शेतकरी अडचणीत आला. राज्य सरकारकडूनही शेतकऱ्यांच्या दुधाला रास्त भाव मिळाला नाही. केंद्र व राज्य सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे अडचणीत आलेल्या शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करावा. राज्यातील शेतकरी आत्महत्येचे प्रमाण वाढत असून त्यांच्या शेतीमालाला रास्त भाव मिळत नाही. दुष्काळातून सावरताना पूर्वीचे कर्ज असल्याने नव्याने कर्ज मिळत नाही. त्यामुळे राज्य सरकारने संपूर्ण कर्जमाफी करावी. याशिवाय दहा ते वीस वर्षापासून शेतकऱ्यांना मोठा फटका सोसावा लागत असून त्याबदल्यात पन्नास हजार ते लाखांची मदत द्यावी.
तेलंगणा सरकारने शेतकऱ्यांना कर्जमाफी केली असून त्या धर्तीवर महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनाही संपूर्ण कर्जमाफी व दुधाचे पडलेले दर आणि दुष्काळ, अवकाळी पाऊस, अतिवृष्टी अशा संकटामुळे शेतकरी अडचणी सापडला आहे. त्यामुळे राज्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढल्या असून सरकारने संवेदनशिलपणे विचार करून शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करावा, अशी मागणी शिवस्वराज्य युवा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संदीपराजे मुटकुळे-पाटील यांनी केली आहे.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.
I do not even know how I ended up here but I thought this post was great I do not know who you are but certainly youre going to a famous blogger if you are not already Cheers