राज्यसेवा पूर्व परीक्षा १ डिसेंबरला
पुणे (बारामती झटका)
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने महाराष्ट्र कृषी सेवा-२०२४ करिता २५८ पदांचा समावेश करण्याचा निर्णय घेतला आहे. अर्ज स्वीकृती करण्यात आल्यानंतर महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षाचे आयोजन येत्या दि. १ डिसेंबर २०२४ रोजी करण्यात येणार आहे.
महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा-२०२४ करिता दि. २९ डिसेंबर २०२३ रोजी विविध संवर्गाच्या एकूण २७४ रिक्त पदांची जाहिरात प्रसिद्ध केली होती. त्यानंतर महाराष्ट्र राज्यातील सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गाकरिता आरक्षण अधिनियम, २०२४ नुसार आरक्षित पदसंख्या नमूद करून एकूण ५२४ पदांचे शुद्धिपत्रक दि. ८ मे २०२४ रोजी प्रसिद्ध केले होते. दरम्यान, शासनाच्या कृषी, पशुसवंर्धन, दुग्धव्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय विभागाकडून महाराष्ट्र कृषी सेवा-२०२४ करिता २५८ पदांचे मागणीपत्र आयोगास प्राप्त झाले.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.
Itss such as yoou read mmy thoughts! Youu appear too grasp so mych aplroximately this,
lik yyou wrot the e-book in it orr something. I think that
youu sinply could ddo with a ffew % too drivee thhe message house a bit,
buut other than that, thus is fantastic blog. A great read.
I’ll definitely be back.