राज्यस्तरीय शैक्षणिक व्हिडिओ निर्मिती स्पर्धेमध्ये नवले दाम्पत्यांचे यश

अंकोली (बारामती झटका) (दशरथ रणदिवे यांजकडून)
राज्यस्तरीय शैक्षणिक व्हिडिओ निर्मिती स्पर्धेमध्ये नवले दाम्पत्यांनी नुकतेच यश मिळवून आपला नावलौकिक मिळवला आहे. महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण, पुणे यांच्यावतीने राज्यस्तरीय शैक्षणिक व्हिडिओ निर्मिती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
या स्पर्धेमध्ये तालुकास्तरावर इयत्ता पहिली – दुसरी गटातून सौ. निर्मला केदारलिंगे – नवले यांनी प्रथम तर तिसरी ते पाचवी गटातून गणित विषयासाठी चंद्रकांत नवले यांनी द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक मिळविले आहे. या स्पर्धेचे बक्षीस वितरण नुकतेच संपन्न झाले. यावेळी जिल्हा परिषदेचे प्राथमिक शिक्षणाधिकारी कादर शेख, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था वेळापूर चे प्राचार्य जितेंद्र साळुंखे, अधिव्याख्याता शशिकांत शिंदे, आणि शिक्षण विस्तार अधिकारी बापूसाहेब जमादार यांच्या हस्ते या पुरस्काराचे वितरण करण्यात आले.
त्यांच्या या यशाबद्दल मोहोळ पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी अविचल महाडिक, मल्लिनाथ स्वामी, केंद्रप्रमुख राजकुमार राऊत, सिद्धेश्वर कलबुर्गी, विविध शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक, शाळा व्यवस्थापन समिती यांनी त्यांचे अभिनंदन केले.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.