राज्यातील २३२९ प्राथमिक शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदल्या; राज्यातील शिक्षकांमध्ये आनंदाचे वातावरण
मुंबई (बारामती झटका)
राज्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदलीचा सहावा टप्पा ऑनलाईन पद्धतीने राबविण्यात आला असून यामध्ये राज्यभरातील २३२९ शिक्षकांच्या बदल्या झाल्या आहेत. यामुळे राज्यातील शिक्षकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. २०१७ पासून आंतरजिल्हा बदल्या ऑनलाईन पद्धतीने होत आहेत. २१ जुन २०२३ च्या शिक्षण विभागाच्या निर्णयाने जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदल्या बंद होण्याचा धोका निर्माण झाला होता. या निर्णयाविरोधात पावसाळी अधिवेशनात २४ जुलैला मुंबईतील आझाद मैदानावर शिक्षक सहकार संघटनेच्या वतीने आंदोलन सुरू करण्यात आले होते. १० हजार शिक्षकांच्या स्वाक्षरीचे निवेदन यावेळी राज्य शासनाकडे सादर केले होते. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावतीने कॅबिनेट मंत्री डॉ. तानाजीराव सावंत यांनी राज्यातील प्राथमिक शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदल्या ऑनलाईन पद्धतीने सुरू करण्यात येतील, असे आश्वासन शिक्षक सहकार संघटनेला दिले होते. २८ ऑक्टोबरला मुंबई येथे राज्यातील प्राथमिक शिक्षकांच्या प्रश्नांबाबत शिक्षणमंत्री दिपक केसरकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या राज्यातील शिक्षक संघटनांच्या बैठकीत शिक्षक सहकार संघटनेचे राज्याध्यक्ष संतोष पिट्टलवाड व राज्य सरचिटणीस निलेश देशमुख यांनी राज्यातील बदलीपात्र झालेल्या सर्व शिक्षकांचा समावेश करून आंतरजिल्हा बदली प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने तात्काळ सुरू करावी अशी मागणी केली होती. शिक्षण मंत्री दिपक केसरकर यांनी सर्वांचा समावेश करून तातडीने आंतरजिल्हा बदली प्रक्रिया सुरू करण्याचे आदेश शिक्षण व ग्रामविकास विभागाला दिले होते. आंतरजिल्हा बदली प्रक्रियेचा सहावा टप्पा पूर्ण झाला असून यामध्ये राज्यातील २३२९ प्राथमिक शिक्षक बदलीने स्वजिल्ह्यात किंवा आवडीच्या जिल्ह्यात लवकरच हजर होणार आहेत. यामुळे बदली झालेल्या शिक्षकांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे. आंतरजिल्हा बदली प्रक्रिया पुर्ण झाल्याबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, ग्रामविकास मंत्री गिरिशजी महाजन, आरोग्यमंत्री डॉ. तानाजीराव सावंत, उत्पादन शुल्क मंत्री शंभुराज देसाई, शिक्षणमंत्री दिपक केसरकर, आ. प्रणिती शिंदे, आ. परिणय फुके, आ. संजयमामा शिंदे, आ. अभिमन्यू पवार, आ. अभिजित वंजारी, आ. किशोर दराडे यांचे राज्यातील शिक्षकांनी आभार मानले आहेत.
शिक्षण सहकार संघटनेचे राज्याध्यक्ष संतोष पिट्टलवाड यांच्या नेतृत्वाखाली आम्ही आतापर्यंत केलेल्या आंदोलन व पाठपुराव्याला आज २३२९ प्राथमिक शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदल्या झाल्याने यश आले. राज्य शासनाचे विशेषतः शिक्षण व ग्रामविकास विभागाचे राज्यातील शिक्षकांकडून आभार व अभिनंदन. ग्रामविकास विभागाचे उपसचिव पोपट देशमुख यांच्यामुळे बदल्या नवीन भरती पूर्वी झाल्याने त्यांचे आभार. – दिपक परचंडे, राज्यकार्याध्यक्ष, शिक्षक सहकार संघटना महाराष्ट्र राज्य.
ग्रामविकास विभागाने बंद होत चाललेल्या आंतरजिल्हा बदल्या ऑनलाईन केल्या, त्याचप्रमाणे जिल्हांतर्गत बदल्या देखील ऑनलाईन पध्दतीनेच राबवुन बदल्यात होणारा भ्रष्टाचार थांबवावा ही विनंती. आंतरजिल्हा बदली झालेल्या शिक्षकांना नविन भरती पुर्वी कार्यमुक्त करावे. – संतोष पिट्टलवाड, राज्याध्यक्ष, शिक्षक सहकार संघटना महाराष्ट्र राज्य
प्राथमिक शिक्षकांची ऑनलाईन आंतरजिल्हा बदली रद्द करणारा अन्यायकारक शासन निर्णयाविरोधात शिक्षक सहकार संघटनेने राज्याध्यक्ष संतोष पिट्टलवाड यांच्या नेतृत्वाखाल आझाद मैदान मुंबई येथे मुंडण आंदोलन केले. या आंदोलनात संपूर्ण राज्यातील शिक्षक सहकार शिलेदार उपस्थित होते. तसेच जिल्हाध्यक्ष रविराज खडाखडे यांच्या नेतृत्वाखाली सोलापूर शिक्षक सहकार टीमने सुद्धा या आंदोलनात सक्रिय सहभाग घेतला होता. मोठ्या प्रमाणात झालेले आंदोलन, मा. मंत्री महोदयांशी वेळोवेळी झालेली चर्चा, मंत्रालयीन स्तरावर वारंवार करण्यात आलेला पाठपुरावा, व अनंत येणा-या अडचणींवर मात करून आज अखेर शिक्षक सहकार संघटनेला यश प्राप्त झाले व ऑनलाईन आंतरजिल्हा बदल्या पून्हा एकदा पार पडल्या.
विठ्ठल टेळे, सुवर्णा गाडे, रविंद्र जेटगी, सचिन निरगिडे, आबासाहेब तरंगे, सुनिल फुंदे, सुमंत मुंढे, विशाल नाईक, संजय दवले, महाळाप्पा लवटे, राजेंद्र पडदुणे, राजेंद्र वाघमोडे, बजरंग कोळी, ज्ञानेश्वर पिसाळ, शिवाजी कदम, राहूल कांबळे, सोमनिंग बिराजदार, सतिश लवटे, सिद्धराम कोळी, नेहरू राठोड, दिपक कांबळे, आमिरपाशा शेख, गणेश देशमुख, धनंजय गोडसे, सचिन वलेकर, बाळू लोखंडे, सतिश बरळ, बापूसाहेब नाईकनवरे, गणेश तरंगे, अनिल भगत यासह अनेक बांधवानी ग्रामविकास विभागाचे अभिनंदन केले.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९७६६७०३५१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.
Your humor added a lot to this topic! For additional info, click here: FIND OUT MORE. What do you think?