रत्नाई कृषी महाविद्यालय, अकलूज यांच्यावतीने धर्मपुरी येथे कृषी सल्ला केंद्राचे उद्घाटन…

धर्मपुरी (बारामती झटका)
रत्नाई कृषी महाविद्यालयाच्या ग्रामीण जागरूकता कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत कृषिदृतांच्या कृषी सल्ला केंद्राचे उद्धाटन करण्यात आले. अकलूज शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष संग्रामसिंह मोहिते पाटील, प्राचार्य आर. जी. नलावडे, प्रा. एस. एम. एकतपुरे, प्रा. एम. एम. चंदनकर, प्रा. एच. व्ही कल्याणी यांच्या मार्गदर्शनानुसार सुदर्शन सांगळे, सार्थक गवळी, राहुल माने, शाम दौंडे, युवराज भोसले, प्रदीप बाबर, अवधूत पटणे, ज्ञानराज भांगे व ऋतिक गायकवाड हे कृषिदूत शेतकऱ्यांना कृषीविषयक सल्ला व मार्गदर्शन करणार आहेत.
या कार्यक्रमास सरपंच सौ. नीता झेंडे, उपसरपंच नितीन निगडे, ग्रामसेवक भाऊसाहेब भोसले, तसेच प्रगतशील शेतकरी व समस्त गावकरी आदी उपस्थित होते. या कार्यक्रमात ग्रामसेवक भाऊसाहेब भोसले यांनीआधुनिक शेती व सेंद्रिय शेतीचे महत्व या विषयावर ग्रामस्थांना मार्गदर्शन केले. तसेच विद्यार्थिनींनी विविध प्रात्यक्षिके व ग्रामीण कृषी कार्यानुभव यासंदर्भात शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.