माळशिरस तालुक्यासहित सोलापूर जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर करा – प्रा. सतीश कुलाळ

माळशिरस (बारामती झटका)
खरीप हंगाम सुरू होऊन आज दि. 17 जुलै 2023 अखेर रोजी दोन महिने पूर्ण होऊन गेले. परंतु, तालुक्यासह जिल्ह्यामध्ये कुठेही पाऊस पडला नसून पावसाअभावी आजपर्यंत कुठेही पेरणी झालेली नाही. माण-खटाव बरोबरच सोलापूर जिल्हा पर्जन्यछायेमध्ये मोडला जातो. परंतु पावसाचे रोहिण्या निघून आज अखेर दोन महिने झाले असून खरीप हंगाम हा संपुष्टात येण्याच्या मार्गावर आहे. तरीही कुठेही पेरणी होताना दिसून आलेली नाही.
पावसाअभावी जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न निर्माण झाला असून शेतीबरोबर दुग्ध व्यवसायही अडचणीत आला आहे. त्यामुळे संपूर्ण शेतकरी आपल्या नजरा आकाशाकडे लावून बसलेला आहे आणि शेतकरी खूप अडचणीत आहे. त्यामुळे राज्य शासनाने माळशिरस तालुक्यासह संपूर्ण सोलापूर जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर करून शेतकऱ्यांसाठी उपाय योजना राबवावी, ही नम्र विनंती.
अशी मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे माळशिरस तालुक्याच्या वतीने तालुकाप्रमुख संतोषभैया राऊत, युवानेते प्रा. सतीश कुलाळ, उपतालुकाप्रमुख महादेवजी बंडगर, युवक उपतालुकाप्रमुख दुर्योधन आडके, ॲड. पी. व्ही. कुलकर्णी, माळशिरस शहर प्रमुख अशोक देशमुख, जेष्ठ शिवसैनिक लालाभाई तांबोळी आदी उपस्थित होते.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng