रामभाऊ यांच्या रूपाने माळशिरस तालुक्याला प्रस्थापितांच्या विरोधात खमक्या विरोधक मिळाला…

मोहिते पाटील यांच्या बालेकिल्ल्यात मुसंडी, अकलूज नगर परिषद निवडणुकीत चार नगरसेवकांनी कमळ फुलवले…
अकलूज (बारामती झटका)
आशिया खंडात सर्वात मोठी समजली जाणार्या अकलूज ग्रामपंचायतीचे नगरपरिषदेमध्ये रूपांतर झाल्यानंतर पहिल्याच निवडणुकीत मोहिते पाटील यांच्या बालेकिल्ल्यात भाजपने मुसंडी मारून अकलूज नगर परिषद निवडणुकीत चार नगरसेवकांनी कमळ फुलवले. माळशिरस तालुक्यात प्रस्थापित मोहिते पाटील यांच्या विरोधात खमक्या विरोधक रामभाऊ यांच्या रूपाने मिळाला असल्याने माळशिरस तालुक्यातील राजकीय चित्र येणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत समितीमध्ये वेगळे दिसणार असल्याची चर्चा माळशिरस तालुक्यात सुरू आहे.
अकलूज ग्रामपंचायतीवर शिवरत्नवरील मोहिते पाटील यांची एक हाती सत्ता ग्रामपंचायत अस्तित्वात आल्यापासून होती. प्रस्थापितांच्या विरोधामध्ये तालुक्यातील विरोधकांनी राजकारण मॅनेज करून स्वतःची राजकीय पोळी भाजून घेतलेली आहे. माळशिरस तालुक्याचे ज्येष्ठ नेते ॲड. सुभाषअण्णा पाटील यांच्या राजकीय संघर्षानंतर माळशिरस तालुक्याला रामभाऊ यांच्या रूपाने प्रस्थापितांच्या विरोधात खमक्या विरोधक मिळालेला आहे. प्रस्थापित मोहिते पाटील यांच्या बालेकिल्ल्यामध्ये भारतीय जनता पक्षाने मुसंडी मारलेली आहे. भाजप व महायुतीचे चार नगरसेवक निवडून येऊन नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार सौ. पुजा करण कोतमीरे यांनी 9717 मतदान घेतलेले आहे. भारतीय जनता पक्षाने जयाभाऊ व रामभाऊ यांच्या मार्गदर्शनाखाली अकलूज मध्ये 41 टक्के मतदान घेतलेले आहे. प्रस्थापित मोहिते पाटलांच्या बालेकिल्ल्यात अशी मुसंडी मारल्यानंतर माळशिरस तालुक्यात जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत निश्चितपणे प्रस्थापितांची दमछाक झाल्याशिवाय राहणार नाही. कारण बालेकिल्ल्यातच रामभाऊ यांनी प्रस्थापितांना घाम फोडलेला होता. पाच नगरसेवक 100 मताच्या आत पराभूत झालेले आहेत. रामभाऊ सातपुते निवडणुकीत जिंकले का हरले, यापेक्षा लढले कसे याचीच चर्चा माळशिरस तालुक्यासह सोलापूर जिल्ह्यात सुरू आहे.
मोहिते पाटील घराण्यातील चार पिढ्या निवडणुकीच्या प्रचारासाठी रस्त्यावर उतरलेल्या होत्या. एकीकडे सिंहांचा कळप होता. अशामध्ये एकटा ढाण्या वाघ लढला आणि चार नगरसेवक जिंकून दाखवून दिले आहे, हम भी कुछ कम नही. येणाऱ्या काळामध्ये निश्चितपणे माळशिरस तालुक्यात रामराज्य आल्याशिवाय राहणार नाही, असा विश्वास राम सातपुते यांच्या समर्थकांमधून व्यक्त केला जात आहे.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.



