रामराज्यात रावणाचा धुडगूस, दसऱ्याला रावण प्रवृत्तीचे दहन होणार…

पूर्वीच्या काळी एक रावण होता, आता गावोगावी, गल्लोगल्ली रावण प्रवृत्तीची संख्या वाढत चालली…
माळशिरस (बारामती झटका)
माळशिरस तालुक्यात खऱ्या अर्थाने भारतीय जनता युवा मोर्चाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष व माळशिरस विधानसभेचे लोकप्रिय दमदार तत्कालीन आमदार आरोग्यदूत राम विठ्ठल सातपुते यांनी तालुक्यात रामराज्य आणलेले होते. रामराज्यात सध्या रावणाचा धुडगूस सुरू आहे. दसऱ्याला रावण दहन केला जातो, तशाच पद्धतीने रामराज्यात रावणाचा धुडगूस दसऱ्याला होवून रावण प्रवृत्तीचे दहन होणार आहे. पूर्वीच्या काळी एक रावण होता, आत्ता गावोगावी, गल्लोगल्ली रावण प्रवृत्तींची संख्या वाढत असल्याची रामराज्यातील जनता बोलत आहे.
महाराष्ट्र राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचे विश्वासू व भारतीय जनता पक्षाचे निष्ठावंत व कट्टर समर्थक राम सातपुते यांना माळशिरस तालुक्याच्या जनतेचे लोकप्रतिनिधी म्हणून सेवा करण्याची संधी मिळाली. राम सातपुते प्रतिकूल परिस्थितीतून आलेले असल्याने सर्वसामान्य जनतेच्या अडीअडचणी व गरीबी काय असते, याचा जवळून अनुभव घेतलेला असल्याने लोकप्रतिनिधी राम सातपुते यांनी आमदार आहे अशी हवा कधीच डोक्यामध्ये जाऊ दिली नाही. लोकप्रतिनिधी कसा असावा याचा आदर्श राम सातपुते यांनी माळशिरस तालुक्याला घालून दिलेला आहे.
गोरगरीब व सर्वसामान्य जनतेला हक्काचे व्यासपीठ मिळावे, यासाठी तालुक्यात प्रथमच जनता दरबाराची संकल्पना सुरू केली. शासकीय विश्रामगृह माळशिरस येथे जनता दरबारासाठी माळशिरस तालुक्याच्या गावागावातून व वाड्यावस्त्यावरून लोक जनता दरबारात येत असत. आपली व्यक्तिगत व सार्वजनिक अडचण दूर करीत असत. त्यामध्ये लाईट, डीपी, रस्ते, समाज मंदिर, सभामंडप, शैक्षणिक मुलांच्या अडचणी अशा वेगवेगळ्या अडचणी घेऊन तालुक्यातील पीडित उपेक्षित जनता येऊन आपल्या प्रश्नांची सोडवणूक करून घेत होती.
जनता दरबारामध्ये खऱ्या अर्थाने माळशिरस तालुक्यात प्रथमच गोरगरीब व सर्व सामान्य जनतेच्या सर्व अवयवाची ऑपरेशन मोफत करून गोरगरीब व सर्वसामान्य जनतेचे आरोग्यदूत म्हणून त्यांना नावलौकिक मिळालेला आहे. माळशिरस तालुक्याच्या पश्चिम भागामध्ये प्रस्थापित यांच्याकडून जाणीवपूर्वक विकासापासून कोसो दूर ठेवलेल्या जनतेच्या प्रश्नांना त्यांनी वाचा फोडली. माळशिरस तालुक्याच्या पश्चिम भागातील विकासाचा बॅकलॉग भरून काढला. अनेक ठिकाणी रस्त्यांच्या व इतर सुविधा उपलब्ध करून माळशिरस तालुक्यात जास्तीत जास्त निधी आणून कामे केलेली असल्याने कामाचा माणूस अशी ओळख निर्माण केलेली आहे. जनतेला सहज उपलब्ध होऊन अथवा बाहेरगावी असताना फोनवर संवाद साधून अनेकांची जागच्या जागी कामे केलेली आहेत.
माळशिरस तालुक्यात लोकप्रतिनिधीला भेटण्यासाठी पाच-पाच तास वाट पाहावी लागत होती. कोणालातरी मध्यस्थ केल्याशिवाय सर्वसामान्य गोरगरीब जनतेला भेटता येत नव्हते. मात्र, राम सातपुते यांनी माळशिरस तालुक्यात लोकप्रतिनिधी व सर्वसामान्य जनता यांच्यामधील दरी कमी करून तालुक्यात नवा पायंडा पाडलेला होता. आपला माणूस हक्काचा माणूस कामाचा माणूस, अशी ओळख निर्माण केलेली आहे.

माळशिरस तालुक्यात लोकसभा व विधानसभेच्या निवडणुकीत राजकीय स्थित्यंतर घडलेली असल्याने तालुक्यात प्रस्थापित व पारंपारिक विरोधक एकत्र येऊनसुद्धा विकासप्रिय नेतृत्व व गोरगरिबांचा आधारवड असणारे राम सातपुते यांना एक लाख आठ हजार मताधिक्य मिळालेले होते. निसटता पराभव जरी झाला तरी पराभवाची तमा न बाळगता केंद्रामध्ये व राज्यांमध्ये भाजप महायुतीचे सरकार असल्याने आमदार असल्यासारखेच माळशिरस तालुक्यात विकासकामांचा ओघ सुरू आहे. प्रस्थापित व पारंपारिक विरोधक यांच्याकडे जनता दुर्लक्ष करीत आहे. आरोग्यदूत राम सातपुते यांच्या संपर्कात असल्याने माळशिरस तालुक्यात दिवसेंदिवस राम सातपुते यांचा राजकीय आलेख वाढत चाललेला आहे. योद्धा राजकारणात ऐकत नसला की बदनाम केला जातो, ही कुटील राजनीती आहे आणि या कुटील राजनीतीचा तालुक्यामध्ये अवलंब सुरू आहे. राम सातपुते यांच्यावर बेछुटपणे अशा पद्धतीने टीका टिपणी सुरू आहे. अपेक्षाभंग झालेला असल्यामुळे राम सातपुते यांच्यावर गरळ ओकत आहेत. मात्र चंदनाच्या झाडाला विषारी नागाने विळखा जरी घातला तरी चंदनाचा वास कमी होत नाही. तशाच पद्धतीने राम सातपुते यांच्यावर एकीकडे टीका होत असताना दुसरीकडे सर्वसामान्य गोरगरीब जनतेचा जनाधार वाढत आहे. माळशिरस तालुक्यात राम राज्य प्रस्थापित केलेले आहे. राम राज्यात रावणाचा धुडगूस सुरू आहे.
पूर्वीच्या काळी एक रावण होता आता गावोगावी, गल्लोगल्ली रावण प्रवृत्तींची संख्या वाढत चाललेली आहे. विजयादशमी दसऱ्याला रावणाचा पुतळा तयार करून दहन केला जातो, तशाच पद्धतीने माळशिरस तालुक्यात राम राज्यात धुडगुस घालणाऱ्या रावण प्रवृत्तीचा येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था, जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपंचायत व नगरपरिषद निवडणुकीत रावण प्रवृत्तीचे दहन करणार असल्याचे सर्वसामान्य व गोरगरीब जनतेतून बोलले जात आहे. लवकरच रामाचा वनवास संपून पुन्हा माळशिरस तालुक्याच्या गोरगरीब व सर्वसामान्य जनतेसाठी जनता दरबारामध्ये पुन्हा रामराज्य दिसणार आहे.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.



