रणजीत दादा यांच्याकडे “चाकरी” मात्र, सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेत लिपिक पदावर “नोकरी”
थेट अक्कलकोट शाखेत यशवंतनगर शाखेतील लिपिक श्री. एच. बी. शेटे यांची रवानगी….
अकलूज (बारामती झटका)
सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बँक शाखा यशवंतनगर येथे लिपिक पदावर कार्यरत असणारे श्री. एच. बी. शेटे यांची थेट अक्कलकोट शाखेत रवानगी करण्याचे सूचना पत्र सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र शिंदे यांनी दिलेले आहे. श्री. एच. बी. शेटे नोकरीस जरी जिल्हा मध्यवर्ती बँकेत असले तरीसुद्धा रणजीतदादा यांच्याकडे चाकरी मात्र, सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेत लिपिक पदावर नोकरी अशी परिस्थिती होती.
ते शेटे आप्पा या नावाने सुपरिचित होते. तसेच विशेष स्वीय सहाय्यक अशीही त्यांची ओळख होती. मात्र, सध्या सोलापूर जिल्ह्यातील राजकीय परिस्थिती बदललेली असल्याचा पहिला झटका रणजीतसिंह यांना बसलेला आहे. माळशिरस तालुक्यामध्ये अनेक संस्थांमध्ये कार्यरत असणारे शिपाई, क्लार्क, ड्रायव्हर, वाहने हे स्वतःच्या कामासाठी वापरून घेणारे नेते मंडळी यांच्या जुलमी व अत्याचारी कारभाराला महायुतीचे सरकार लगाम घालणार आहे. आगे देखो क्या क्या होता है…, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगलेली आहे.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.