ताज्या बातम्याराजकारण

रणजितसिंह मोहिते पाटील यांची आमदारकी घेतेय शेवटचा श्वास..!

अकलूज (बारामती झटका)

भाजपने रणजितसिंह मोहिते पाटील यांना दिलेल्या विधान परिषद आमदारकीची मुदत येत्या काही दिवसांत संपत असताना आ. मोहिते यांची ना घर का, ना घाट का… अशी अवस्था सध्या पाहायला मिळत आहे. भाजपने यांना विधानपरिषद दिली परंतु, यांनी भाजपशी गद्दारी करत लोकसभेला, विधानसभेला भाजप विरोधात काम केले.

भाजपचे वरिष्ठ नेते देवेंद्रजी फडणवीस साहेब, रवींद्र चव्हाण साहेब यांनी तर सध्या पक्षात राहून पक्षाशी गद्दारी करणाऱ्यांना थारा नाही, ही स्पष्ट भूमिका घेतलेली दिसत आहे.

मी भाजपाचाच आहे, हे दाखवण्यासाठी रणजितसिंह मोहिते पाटील हे अनेक केविलवाणे प्रयत्न करत आहेत, परंतु पक्ष व वरिष्ठ नेते याला भीक घालताना दिसत नाहीत.

मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब व प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेब यांना वैयक्तिक भेटीसाठी अनेकदा वेळ मागूनही साधी भेट मिळत नाही. त्यामुळे सार्वजनिक कार्यक्रमात जाऊन नेत्यांच्या मागे-पुढे करणे व ते फोटो वायरल करण्याची वाईट वेळ आ. मोहिते पाटील यांच्यावरती आली आहे.

भाजपच्या विरोधात काम करण्यामुळे धैर्यशील मोहिते पाटील खासदार झाले, उत्तमराव जानकर आमदार झाले परंतु, यामुळे गद्दारीचा शिक्का पडलेल्या रणजितसिंह मोहिते पाटील यांच भविष्य काय ?या विवंचनेत आ. मोहिते पाटील यांचे कार्यकर्ते दिसत आहेत.

या डबल ढोलकी कार्यक्रमाला कार्यकर्ते नाकारताना दिसत आहेत. चमकूगिरीत तरबेज असलेले आ. मोहिते पाटील यांनी देवेंद्रजी फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिर घेतले परंतु, १५० आकडा सुद्धा हे ओलांडू शकले नाहीत. यातूनच त्यांची जनतेशी असलेली नाळ व भाजपविषयी प्रेम किती आहे, हे दिसून येत आहे.

देवेंद्रजी फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिराचे उद्घाटन, वृक्षारोपण हे शरद पवार गटात प्रवेश केलेल्या शिवतेजसिंह मोहिते पाटील व अर्जुनसिंह मोहिते पाटील यांच्या हस्ते करण्यात आले, हे पुतना मावशी सारखं रणजितसिंह मोहिते पाटील यांचं भाजपवरच प्रेम पक्षाच्या कधीचं लक्षात आलं आहे.

भाजपमधे पक्षनिष्ठा, तत्त्वनिष्ठा या मूल्यांचं महत्त्व वेळोवेळी अधोरेखित होत आलं आहे. मात्र, रणजितसिंह मोहिते पाटील यांनी ही मूल्यं पायदळी तुडवत, स्वतःचा स्वार्थ साधण्यासाठी वेळप्रसंगी शरद पवारांच्या पक्षाच्या दारात लोटांगण घालायला मागेपुढे पाहिलं नाही. स्वतःला आंतरराष्ट्रीय नेते समजणाऱ्या रणजितसिंह मोहिते पाटील यांना आता गद्दारीचे परिणाम दिसू लागले आहेत. ना कारखान्याला मदत, ना विकास निधी, ना कोणती वैयक्तिक काम होतायेत.

परंतु, सध्या ‘मी भाजपचाच’ हा केवळ राजकीय अभिनय आहे का ?, की विधानपरिषदेची मुदत संपत आल्याने पुढील राजकीय करिअरसाठी पुन्हा एकदा पाया पडण्याची सुरूवात आहे ? पक्षात आहे, असे किती जरी दाखवले तरी मनात भाजप आहे का, की फक्त तोंडावर हे पक्षश्रेष्ठी चांगलेच ओळखून आहेत. त्यामुळे भविष्यात आमदारकीच्या मुदतीसोबत रणजितसिंह मोहिते पाटील यांचं राजकारण पण शेवटच्या घटका मोजताना दिसेल, यात शंका नाही. अशी भाजपसह विरोधी पक्षाच्या राजकीय वर्तुळात गल्लीपासून दिल्लीपर्यंत चर्चा सुरू आहे.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.

Related Articles

Back to top button
marsbahis hacklink market casibom