राष्ट्रमाता जिजाऊंनी संस्काराची आदर्श शिकवण दिली – जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, छ्त्रपती संभाजीनगर
सोलापूर (बारामती झटका)
जुने जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बहुउद्देशीय सभागृहात जिल्हा परिषद प्रशासन व मराठा सेवा संघाच्या वतीने राष्ट्रमाता जिजाऊ यांच्या जयंती निमित्त जिल्हा परिषदेत काम करणाऱ्या कर्तृत्ववान महिलांचा गौरव जिल्हाधिकारी दिलीप स्वामी व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांचे हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सिईओ कुलदीप जंगम हे होते. या प्रसंगी उप मुख्य कार्यकारी अधिकारी स्मिता पाटील, उप मुख्य कार्यकारी अधिकारी इशाधिन शेळकंदे, मराठा सेवा संघाचे जी. के. देशमुख, म्हाडाचे उपसंचालक अजयसिंह पवार, कार्यकारी अभियंता नरेंद्र खराडे आदी प्रमुख मान्यवर उपस्थित होते.
महिलांचे सक्षमीकरणाची शिदोरी राष्ट्रमाता जिजाऊंनी दिली. जिजाऊंच्या शिकवणीमुळे महाराष्ट्र घडला आहे. महिला पुरूषाचे बरोबरीने काम करत आहेत. संस्कार हा महत्वाचा आहे. पद येत असते, जात असते. परंतू ऋणानुबंध महत्वाचे आहेत. मला सोलापूर जिल्ह्याने प्रेम दिले. सोलापूर जिल्हा काम करण्यासाठी खुप चांगला जिल्हा आहे.प्राथमिक शिक्षण विभागाच्या माध्यमातून राबविलेले दशसुत्री व स्वच्छ शाळा सुंदर शाळा उपक्रम छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात राबवित आहोत, असेही जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी सांगितले.
या प्रसंगी अध्यक्ष पदावरून बोलताना सिईओ कुलदीप जंगम म्हणाले, राष्ट्रमाता जिजाऊंनी हिंदवी स्वराज्य उभारताना सर्व घटकांना एकत्रित करणेची प्रेरणा छत्रपती शिवाजी महाराज यांना दिली. महिलांना समान वागणूक देणे, महिलांचा सन्मान करणे, महिलांना सक्षम करून न्याय देणे, हीच खरी जिजाऊ जयंती खरे अर्थाने साजरी केल्यासारखे आहे.
या प्रंसगी उप मुख्य कार्यकारी अधिकारी स्मिता पाटील यांनी जिजाऊंच्या कार्याचा गौरव करीत जिजाऊंच्या प्रेरणेमुळेच सर्व क्षेत्रात महिला सक्षमपणे काम करीत असल्याचे सांगितले. आपल्या अभ्यासपुर्ण भाषणात त्यांनी जिजाऊंची एतिहासिक कामगिरी उभी करून सर्वांना मार्गदर्शन केले. या प्रसंगी उप मुख्य कार्यकारी अधिकारी इशाधिन शेळकंदे यांनी जिल्हाधिकारी स्वामी यांच्या कार्यकाळात अनेक नाविण्यपुर्ण योजना राबविण्यात आलेने अधिकारी व कर्मचारी यांच्यामध्ये चैतन्य निर्माण केले असल्याचे सांगून राष्ट्रमाता जिजाऊ यांचे कार्य गड, किल्ले व छत्रपती शिवाजी महाराज यांचा देशभरात असलेल्या दबदब्यावरून जिजाऊंच्या संस्काराची प्रचिती येत असल्याचे सांगितले.
या प्रसंगी मराठा सेवा संघाचे अध्यक्ष जी. के. देशमुख म्हणाले, मराठा सेवा संघ ही काही जातीय संघटना नाही. सामाजिक उपक्रम राबवून बहुजनांना हातात पुस्तक घेण्याची प्रेरण पुरुषोत्तम खेडकर यांनी दिली आहे. महिलांना संघटित करून त्यांचा सिनाम केला जात असलेने ही गौरवाची बाब असल्याचे सांगितले.
या प्रसंगी २२ कतृत्वान महिलांचा सन्मान करण्यात आला. मराठा सेवा संघ दिनदर्शीकेचे उद्घाटन करण्यात आले.
यावेळी स्वागत मराठा सेवा संघाचे अध्यक्ष अविनाश गोडसे यांनी केले. तर सुत्रसंचालन पल्लवी पवार यांनी केले तर आभार जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक सचिन जाधव यांनी केले. या प्रसंगी जिल्हा परिषदेचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी इशाधिन शेळकंदे, कार्यकारी अभियंता नरेंद्र खराडे, कास्ट्राईबचे अरूण क्षीरसागर, ग्रामसेवक संघटनेचे अध्यक्ष तात्यासाहेब पाटील, जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांचा गौरव केला.
जिजाऊ जयंतीनिमित्त झेडपी मराठा सेवा संघ शाखेतर्फे विविध कार्यक्रम करण्यांत आले. दि. ११ जानेवारी वार शनिवार रोजी सकाळी १० वा. बहुउद्देशीय सभागृहामध्ये रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले.
त्यानंतर जिल्हा परिषद मधील सर्व जिजाऊ-सावित्री लेकींचा सन्मान करण्यात आला. मा. जिल्हाधिकारी छत्रपती संभाजीनगर दिलीप स्वामी यांच्याहस्ते मा. मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांचे अध्यक्षतेखाली, मराठा सेवा संघ जि. प. चे अध्यक्ष अविनाश गोडसे, जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक सचिन जाधव यांचे प्रमुख उपस्थितीत व सर्व अधिकारी व कर्मचारी यांच्या उपस्थितीत कर्तृत्वान महिलांचा सत्कार करण्यात आला. यामध्ये कर्तृत्वान महिला म्हणून लेखाधिकारी रुपाली रोकडे, बाल विकास प्रकल्प अधिकारी रेश्मा पठाण, वैद्यकिय अधिकारी डॉ. अनिसा तांबोळी, गट शिक्षणाधिकारी जयश्री सुतार, प्रशासन अधिकारी पुष्पा भड, शाखा अभियंता उषा भोसले, कनिष्ठ अभियंता सना नदाफ, विस्तार अधिकारी (पं) स्वास्ती गायकवाड, विस्तार अधिकारी (कृषि) रेखा डोके, मुख्याध्यापिका ललिता मोरे, सहशिक्षिका उर्मिला माने, जिल्हा लेखा व्यवस्थापक वैशाली थोरात, जिल्हा पाणी गुणवत्ता सल्लागार दिपाली व्हटे-पवळे, ग्रामपंचायत अधिकारी मंजुश्री कारंडे, वरिष्ठ सहाय्यक सुजाता कांबळे, वंदना जाधव, कनिष्ठ सहाय्यक आरती माढेकर, आरोग्य सेविका मैना माने, परिचर वर्षा औदुर्ती, सविता काळे यांचा सन्मान करण्यात आला
तसेच रक्तदान शिबीरामध्ये 39 जणांनी सहभाग घेतला. यावेळी जिजाऊ विभागीय महिला अध्यक्ष मिनाक्षी जगदाळे, संभाजी बिग्रेड जिल्हाध्यक्ष सोमनाथ राऊत, उप कार्यकारी अभियंता सुनिल कटकधोंड, ग्रामपंचायत अधिकारी संघटनेचे कार्याध्यक्ष टी. आर. पाटील, शिक्षक संघटनेचे अध्यक्ष निलेश देशमुख, अभियंता संघटनेचे जिल्हाध्यक्ष सरडे, कॅस्ट्राईब संघटनेचे जिल्हाध्यक्ष अरूण क्षीरसागर, महाराष्ट्र राज्य कर्मचारी महासंघाचे जिल्हाध्यक्ष राजेश देशपांडे, राज्य सरचिटणीस विवेक लिंगराज, महाराष्ट्र राज्य कर्मचारी महासंघ राज्य उपाध्यक्ष दिनेश बनसोडे, कॅस्ट्राईब संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष गिरीष जाधव, आरोग्य कर्मचारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष समीर शेख, शिक्षक संघटनेचे जिल्हाध्यक्ष अनुरुद्ध पवार, जुनी पेन्शन संघटनेचे जिल्हाध्यक्ष रामराव शिंदे, संतोष माने, अनिल जगताप, संजय बाणूर, सचिन घोडके, सचिन चव्हाण, विकास भांगे, चेतन भोसले, ऋषिकेश जाधव, वासुदेव घाडगे, विशाल घोगरे, रणजीत गव्हाणे, विठ्ठल मलपे, सचिन पवार, रोहीत घुले, संतोष शिंदे, संतोष निळ, गणेश साळुखे अभिजीत निचळ, प्रकाश शेंडगे, सर्जेराव गाडेकर, उमेश खंडागळे, सचिन खराडे, प्रसाद काशीद, जयंत पाटील, महेंद्र माने, गणेश कलुबर्मे, गोपाल शिंदे, संजय चव्हाण व्ही. आर. कदम, आश्विनी सातपुते, अनिता भुसारे, अनुपमा पडवळे, भारती धुमाळ, सविता मिसाळ, ज्योस्ना साठे, प्रतिक्षा गोडसे, शितल भोसले, राजश्री रोजी, छाया क्षीरसागर, अर्चना निराळी, अनिता तुपारे, सविता चव्हाण, प्रतिक्षा कांबळे राजश्री कांगरे आदी उपस्थित होते.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.