लोणंद येथे हनुमान जयंती निमित्त अखंड हरिनाम सप्ताह व श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण वाचन चे आयोजन

लोणंद (बारामती झटका)
लोणंद ता. माळशिरस येथे हनुमान जयंती निमित्त सालाबाद प्रमाणे याही वर्षी अखंड हरिनाम सप्ताह व श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण वाचन सोहळ्याचे आयोजन बुधवार दि. १७/४/२०२४ पासून ते मंगळवार दि. २३/४/२०२४ पर्यंत हनुमान मंदिर, लोणंद येथे करण्यात आले आहे. सदर स्वतःचे यंदाचे पंधरावे वर्ष आहे.
संसाररुपी महासागरातून तरुन जाण्यासाठी नाम चिंतनाची अत्यंत आवश्यकता आहे. तसेच हिंदू धर्म संस्कृतीचे जतन करण्यासाठी नाम यज्ञाचे आयोजन करण्यात आले आहे. सदर नाम यज्ञात वैष्णव जनांचे प्रवचन व कीर्तन सेवा होणार आहे. यामध्ये बुधवार दि. १७/४/२०२४ रोजी ह. भ. प. बंडा महाराज डोंबाळे करकंब यांचे कीर्तन होणार असून सकाळच्या नाष्टा धनाजी रुपनवर, दुपारचे जेवण शिवाजी पालवे आणि संध्याकाळचे जेवण अर्जुन बोधले यांच्या वतीने देण्यात येणार आहे. गुरुवार दि. १८/४/२०२४ रोजी ह. भ. प. प्राचीताई सरवदे करमाळा यांच्या कीर्तनाचे आयोजन करण्यात आले असून सकाळचा नाष्टा महादेव जाधव, दुपारचे जेवण भीमराव माने, संध्याकाळचे जेवण हंबीर कोल्हाळे यांच्या वतीने देण्यात येणार आहे. शुक्रवार दि. १९/४/२०२४ रोजी ह. भ. प. आशुतोष महाराज कुलकर्णी, लोणंद यांचे कीर्तन होणार असून या दिवशी सकाळचा नाष्टा हंबीर कोल्हाळे, दुपारचे जेवण नामदेव होळ, संध्याकाळचे जेवण दीपक रुपनवर यांच्या वतीने देण्यात येणार आहे. शनिवार दि. २०/४/२०२४ रोजी ह. भ. प. पायलताई घुले पानिव यांचे कीर्तन होणार असून या दिवशी सकाळचा नाश्ता संभाजी रुपनवर, दुपारचे जेवण बबन कोल्हाळे तर संध्याकाळचे जेवण संपत इंगळे यांच्या वतीने देण्यात येणार आहे. रविवार दि. २१/४/२०२४ रोजी ह. भ. प. गौरवराज महाराज रुपनवर यांचे कीर्तन होणार असून ह. भ. प. विजय जाधव व ह. भ. प. विजय मोरे सरडेकर यांचा भारुडाचा कार्यक्रम होणार आहे. या दिवशी सकाळचा नाष्टा नंदकुमार पोळ, दुपारचे जेवण रामदास रुपनवर तर संध्याकाळचे जेवण धनाजी रुपनवर यांच्या वतीने देण्यात येणार आहे. सोमवार दि. २२/४/२०२४ रोजी ह. भ. प. बाळासाहेब झगडे महाराज झगडे का. बोरी यांच्या कीर्तनाचे आयोजन करण्यात आले असून या दिवशी सकाळचा नाष्टा केरबा तांबवे, दुपारचे जेवण जनार्दन राऊत तर संध्याकाळचे जेवण सर्जेराव खुडे यांच्या वतीने देण्यात येणार आहे. मंगळवार दि. २३/४/२०२४ रोजी सकाळी सूर्योदयाच्या वेळी हनुमान जयंतीनिमित्त गुलाल व पुष्पवृष्टी करण्यात येणार आहे. तसेच ह. भ. प. जगन्नाथ महाराज शिंदे संगम माहुवली यांचे सकाळी १० ते १२ काल्याचे किर्तन होणार आहे. या दिवशी सकाळीचा नाष्टा बाळासाहेब होळ यांच्या वतीने देण्यात येणार आहे तर दगडू गेना रुपनवर माजी सरपंच, अजित ज्वेलर्स यांच्या वतीने महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.

या सप्ताहामध्ये पहाटे ४ ते ६ काकडा, सकाळी ७.३० ते ११, श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण, सायंकाळी ५ ते ६ प्रवचन, सायंकाळी ६ ते ७ हरिपाठ व रात्री ९ ते ११ कीर्तन व नंतर हरिजागर असा दिनक्रम असणार आहे.
तरी लोणंद व पंचक्रोशीतील भाविक भक्तांनी व ग्रामस्थांनी या सप्ताहाचा लाभ घेण्याचे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.