राष्ट्रवादी काँग्रेस माळशिरस तालुका कार्याध्यक्ष दादासाहेब मुंजे यांच्या वाढदिवसाला लाडक्या बहिणींना साडी वाटप…

श्रीराम शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्रकाशबापू पाटील यांच्या उपस्थितीत वाढदिवसाला एक हजार साड्या वाटपाचा कार्यक्रम संपन्न होणार…
शिंगोर्णी (बारामती झटका)
शरदचंद्रजी पवार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे माळशिरस तालुका कार्याध्यक्ष दादासाहेब मुंजे यांच्या वाढदिवसानिमित्त सोमवार दि. 18/08/2025 रोजी सायंकाळी 07 ते 09 या वेळेमध्ये मारुती मंदिर समोर, शिंगोर्णी, ता. माळशिरस येथे एक हजार लाडक्या बहिणींना वाढदिवसानिमित्त साड्या वाटपाचा कार्यक्रम श्रीराम शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्रकाशबापू पाटील व अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न होणार आहे. समाज उपयोगी कार्यक्रमानंतर स्नेहभोजनाचे आयोजन करण्यात आले आहे…


राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे माळशिरस तालुका कार्याध्यक्ष दादासाहेब मुंजे यांनी समाजामध्ये अनेक सामाजिक उपक्रम घेऊन आपल्या समाजकार्याचा ठसा जनतेमध्ये उमटविलेला आहे. वाढदिवसानिमित्त विविध जाती धर्मातील एक हजार महिलांना साडी वाटपाच्या कार्यक्रमाचे आयोजन केले असून उपस्थित सर्वांना वाढदिवसानिमित्त स्नेह भोजनाचे आयोजन केलेले आहे. तरी मित्रपरिवार व नातेवाईक यांनी सदर कार्यक्रमास उपस्थित राहावे, असे दादासाहेब मुंजे मित्रपरिवार व वाढदिवस संयोजन समितीच्या वतीने उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.



