राष्ट्रवादी काँग्रेस माळशिरस तालुका युवक अध्यक्ष राहुल सावंत यांच्या जागी अक्षय दडस यांची नियुक्ती…

माढा लोकसभा निवडणुकीत महायुतीचा धर्म न पाळणाऱ्या पदाधिकाऱ्यांच्या नियुक्ती रद्द करण्याच्या महत्त्वपूर्ण निर्णयामुळे तालुक्यात खळबळ….
माळशिरस (बारामती झटका)
महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा पवार व महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष सुरजदादा चव्हाण यांच्या मान्यतेने सोलापूर जिल्हा युवक अध्यक्ष अभिषेक आव्हाड यांनी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे माळशिरस तालुका अध्यक्ष राहुल अरुण सावंत यांच्या जागी अक्षय भगवान दडस यांची नियुक्ती केलेली आहे. लोकसभेच्या निवडणुकीत महायुतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा गट समाविष्ट होते. पक्षाचा प्रोटोकॉल पाळला नाही, महायुतीचा धर्म न पाळल्याने तालुका अध्यक्ष पदाची जबाबदारी काढून नवीन अध्यक्षाची नेमणूक केलेली आहे. माढा लोकसभेच्या निवडणुकीत महायुतीचा धर्म न पाळणाऱ्या पदाधिकाऱ्यांच्या नियुक्ती रद्द करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णयामुळे तालुक्यात राजकीय खळबळ उडालेली आहे.
सोलापूर जिल्हा नियोजन समितीचे सदस्य राष्ट्रवादीचे नेते सुरेशआबा पालवे पाटील, माळशिरस नगरपंचायतीचे माजी नगराध्यक्ष तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष शिवाजीराव देशमुख, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे सोलापूर जिल्हा कार्याध्यक्ष अक्षयभैया भांड यांनी माळशिरस येथील राष्ट्रवादी काँग्रेस भवनमध्ये पिरळे गावचे युवा नेते श्री. अक्षय भगवान दडस यांची माळशिरस तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आल्याचे पत्र देऊन भविष्यातील राजकीय कारकीर्दीस शुभेच्छा देण्यात आल्या.

यावेळी राष्ट्रवादी ओबीसी सेलचे तालुका अध्यक्ष दत्तात्रय ढेकळे, माळशिरस नगरपंचायतीचे माजी उपनगराध्यक्ष अजिनाथ वळकुंदे, माळशिरस शहराध्यक्ष नानासाहेब चव्हाण, पिरळे विविध कार्यकारी सेवा सोसायटीचे माजी व्हाईस चेअरमन दादासाहेब ठवरे, बबनराव साळवे, राजेंद्र बल्लाळ, पृथ्वीराज ठोंबरे, पप्पू बुधावले सुरेश सरगर, शुभम बागनवर, शिवसेना अध्यक्ष आकाश खिलारे आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी नूतन तालुका अध्यक्ष अक्षय भगवान दडस यांनी भविष्यात महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ध्येयधोरणे ग्रामीण भागात, गावागावात व वाड्या वस्त्यावर पोहचवून पक्ष वाढीचे काम करून माझ्यावर टाकलेल्या विश्वासाला पात्र राहील, असे मनोगतामध्ये सांगितले.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.