राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष सोमनाथ लोहार यांचे वैद्यकीय मंत्री हसनजी मुश्रीफ यांना निवेदन

कोलकाता येथील आरजी कर मेडिकल कॉलेज आणि रुग्णालय येथील घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन राज्यातील वैद्यकीय शिक्षण संस्थांमध्ये काळजी घेण्याबाबत निवेदन
मुंबई (बारामती झटका)
वैद्यकीय शिक्षण मंञी हसनजी मुश्रीफ साहेब यांची कोलकत्ता येथील आरजी कर मेडिकल कॉलेज आणि रुग्णालय येथील घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन अभिषेक बोके (विधानसभा अध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी छ. शिवाजी नगर) यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस पाश्चिम महाराष्ट्र तर्फे महाराष्ट्र राज्यातील वैद्यकीय शिक्षण संस्थांमध्ये सतर्कता बाळगण्याबाबत, सोमनाथ लोहार (अध्यक्ष, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस पाश्चिम महाराष्ट्र), यश कुलकर्णी (प्रदेश सरचिटणीस, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस पाश्चिम महाराष्ट्र) तसेच केशव माने (प्रदेश सरचिटणीस, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस पाश्चिम महाराष्ट्र) यांनी भेट घेतली. तसेच मुश्रीफ साहेबांनी सतर्कतेबाबत तात्काळ कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले.
सदर निवेदनामध्ये असे नमूद करण्यात आले आहे की, महाराष्ट्रातील वैद्यकीय शिक्षण संस्थांत अनेकवेळा रॅगिंग संदर्भात केसेस दाखल होतात. पण, त्याकडे गांभीर्याने घेतले जात नाही. कोलकत्ता येथील आरजी कर मेडिकल कॉलेज आणि रुग्णालयामध्ये पोस्ट ग्रॅज्युएट ट्रेनी डॉक्टरवर बलात्कार करून झालेल्या हत्येच्या घटनेमुळे संपूर्ण देशात संतापाचे वातावरण आहे. अशा स्वरूपाची घटना घडू नये, याची काळजी वैद्यकीय शिक्षण मंत्री म्हणून आपली जबाबदारी आहे. यासंदर्भात परिपत्रक काढून सर्व वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयांना योग्य त्या सूचना देण्याची विनंती या निवेदनात करण्यात आली आहे.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.