राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष बाबासाहेब माने पाटील यांचा राजीनामा
माळशिरस (बारामती झटका)
कण्हेर ता. माळशिरस येथील माजी उपसरपंच राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे (शरदचंद्र पवार गट) माळशिरस तालुका अध्यक्ष जगन्नाथ उर्फ बाबासाहेब नामदेव माने पाटील यांनी राजीनामा दिला आहे. सदरचा राजीनामा बळीराम काका साठे जिल्हाध्यक्ष, राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार गट) यांच्याकडे दिला आहे.
सदर निवेदनात असे नमूद करण्यात आले आहे कि, मी जगन्नाथ उर्फ बाबासाहेब नामदेव माने पाटील, मु.पो. माळशिरस, जि. सोलापूर, येथील रहिवासी असून मी २०२०-२०२१ रोजी पासून राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार गट) या पक्षाच्या माळशिरस तालुका युवक अध्यक्ष पदावरती कार्यरत आहे. मी आज दि. ३१/०१/२०२५ रोजी माझ्या वैयक्तिक कारणाने राजीखुशीने राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार गट) माळशिरस तालुका युवक अध्यक्ष पदाचा राजीनामा देत आहे. तरी राजीनामा मंजूर करून घ्यावा ही विनंती. असे या पत्रात नमूद करण्यात आले आहे.
सदर निवेदनाची प्रत सुरजभैय्या देशमुख सोलापूर जिल्हाध्यक्ष, राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार गट) यांच्याकडे देण्यात आली आहे.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.