माळशिरस येथे ग्रामीण रुग्णालयात पल्स पोलिओ कार्यक्रम

माळशिरस (बारामती झटका)
माळशिरस ग्रामीण रुग्णालय येथे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर मुकुंद जामदार यांच्या मार्गदर्शनाखाली डॉक्टर सुमित सरवदे यांच्या सहकार्याने पल्स पोलिओ कार्यक्रम इन्चार्ज सुरेखा शिंदे, सिस्टर पायल जाधव, उज्वला भगवान करे, मनीषा मोहन पवार यांनी सकाळपासून पल्स पोलिओ सुरू केलेले आहे. पल्स पोलिओ वैद्यकीय क्षेत्रात चळवळ उभा राहिलेली आहे.
संपूर्ण देशात पल्स पोलिओ अभियान राबविले जाते. ग्रामीण भागात सुद्धा एकही बालक वंचित राहणार नाही, याची दक्षता अंगणवाडी सेविका, बालवाडी मदतनीस व वैद्यकीय क्षेत्रातील प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र, ग्रामीण रुग्णालय अशा ठिकाणी घेतली जाते.
पोलिओ हा मज्जासंस्थेवर परिणाम करणारा आजार असून त्यामुळे गंभीर आजार, अर्धांगवायू किंवा मृत्यु देखील होऊ शकतो. पल्स पोलिओ लसीकरण मोहिम प्रभावीपणे राबविल्यामुळे सन १९९९ पासून देशात पोलिओ रुग्णांच्या संख्येत लक्षणीय घट झालेली आहे. जागतिक आरोग्य संघटनेने १९९८ सालापासून ‘पल्स पोलिओ’ची मोहीम सुरू केली. दरवर्षी जानेवारी व फेब्रुवारी महिन्यात ‘पोलिओ रविवार’ साजरे केले जातात. लोकांच्या घरोघरी जाऊन ‘पोलिओ रविवार’च्या नंतरच्या आठवडय़ात ५ वर्षांखालील मुलांना पोलिओ डोस पाजले गेले.
महिला आपल्या लहान मुलांना घेऊन नजीकच्या पल्स पोलिओ ठिकाणी जाऊन पल्स पोलिओमध्ये सहभागी होऊन आपल्या लहान बाळाचे डोस पूर्ण करीत असतात. माळशिरस ग्रामीण रुग्णालय येथे सकाळपासून महिलांची रांग लागलेली होती. माळशिरस तालुक्यात पल्स पोलिओला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.