ताज्या बातम्या

राष्ट्रवादीचे नेते उत्तमराव जानकर यांनी श्री संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा मुक्काम स्थळाची पाहणी केली…

वेळापूर (बारामती झटका)

माळशिरस पंचायत समितीचे माजी उपसभापती अकलूज कृषी उत्पन्न बाजार समितीचे विद्यमान संचालक राष्ट्रवादीचे नेते उत्तमराव जानकर यांनी श्री संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यातील वेळापूर ता. माळशिरस, येथे मुक्काम असतो, या मुक्कामच्या तळाची पाहणी करण्यात आली. यावेळेस अकलूज कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक यशवंतराव उर्फ दादाराजे घाडगे, ग्रामविकास अधिकारी कैलास सुरवसे, माजी उपसरपंच निवृत्ती भुसारे, आरटीओ संघटनेचे अध्यक्ष संजय देशपांडे, उद्योजक नजीरभाई शेख, युवा नेते जवान माने देशमुख व उत्तमराव जानकर यांचे विश्वासू सहकारी रणजीत सरवदे आदी मान्यवर उपस्थित होते.

संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज व जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज यांच्या पायी वारी पालख्यांचे काही दिवसांवर माळशिरस तालुक्यात आगमन होणार आहे. माळशिरस तालुक्यात श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखीचा तिसरा मुक्काम वेळापूर, ता. माळशिरस येथे असतो.

पालखी तळावर येणाऱ्या भाविकांची व वैष्णवांची अडचण होऊ नये, यासाठी प्रशासन सतर्क असते. योग्य प्रकारे नियोजन करण्यासाठी उत्तमराव जानकर यांनी पालखी मुक्काम तळाला सदिच्छा भेट दिलेली आहे. गेल्या २५ वर्षापासून वेळापूर ग्रामपंचायत ताब्यात असल्याने ग्रामपंचायतीमार्फत येणाऱ्या भाविकांना सुख सुविधा उपलब्ध केल्या जातात.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.

Related Articles

Leave a Reply

Back to top button