राष्ट्रवादीचे नेते उत्तमराव जानकर यांना वगळून इतर मागास बहुजन कल्याण विभागाचा कार्यक्रम संपन्न होत आहे…
विमुक्त जाती व भटक्या जमाती, इतर मागास व विशेष मागास प्रवर्गासाठी शासकीय योजनांचा प्रचार व प्रसार कार्यक्रम माळशिरस पंचायत समिती सभागृहात संपन्न होत आहे.
माळशिरस (बारामती झटका)
इतर मागास बहुजन कल्याण विभाग महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने सहाय्यक संचालक इतर मागास बहुजन कल्याण सोलापूर श्रीमती मनीषा फुले यांनी आयोजित केलेल्या माळशिरस पंचायत समिती सभागृहात कार्यक्रमाच्या पत्रिकेवर माळशिरस पंचायत समितीचे माजी उपसभापती अकलूज कृषी उत्पन्न बाजार समितीचे विद्यमान संचालक राष्ट्रवादीचे नेते उत्तमराव जानकर यांचा निमंत्रण पत्रिकेमध्ये नामोल्लेख नसल्याने त्यांना वगळून कार्यक्रम होत असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे.
विमुक्त जाती व भटक्या जमाती, इतर मागास या विशेष मागास प्रवर्गासाठी शासकीय योजनांचा प्रचार व प्रसार व्हावा, यासाठी ‘उत्कर्ष बहुजनांचा, संकल्प बहुजन कल्याणाचा’ उपक्रम 2024-2025 या अंतर्गत मंगळवार दि. 3/9/2024 रोजी सकाळी 11 वाजता माळशिरस पंचायत समिती मधील संत गाडगेबाबा सभागृह येथे कार्यक्रम संपन्न होत आहे. सदरच्या कार्यक्रमास लोकप्रतिनिधी म्हणून आमदार, खासदार यांची नावे आहेत व इतरही काही नावे असल्याने सदरच्या कार्यक्रमामध्ये राष्ट्रवादीचे नेते उत्तमराव जानकर यांचाही नामोल्लेख असणे गरजेचे होते.
कार्यक्रम जर शासनाचा असेल तर, प्रोटोकॉलप्रमाणे लोकप्रतिनिधी यांची नावे ठीक आहेत. उत्तमराव जानकर यांचे नाव नसल्याने राजकीय वर्तुळात उलट सुलट चर्चा सुरू आहे. सदरच्या कार्यक्रमास सरपंच, ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकारी, ग्रामपंचायत सदस्य सर्वांनी उपस्थित रहावे, असे माळशिरस पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी यांनी पत्र काढलेले असून सदरच्या प्रती विस्ताराधिकारी पंचायत समिती यांना देण्यात आलेल्या आहेत.
सदरच्या कार्यक्रमात विमुक्त जाती व भटक्या जमाती, इतर मागास व विशेष मागास प्रवर्ग यांच्याकरिता महाराष्ट्र शासन यांच्याकडून दिल्या जाणाऱ्या सामाजिक, आर्थिक व शैक्षणिक योजनांची माहिती लाभार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी माळशिरस येथे तालुकास्तरीय मेळावा आयोजित करण्यात आला आहे. तालुक्यात एवढा मोठा कार्यक्रम होत असताना एका गटाचे नेतृत्व करणारे राजकीय नेतृत्व राष्ट्रवादीचे नेते उत्तमराव जानकर यांचा पत्रिकेत नामोल्लेख नसल्याने माळशिरस तालुक्यात राजकीय वर्तुळात उलट सुलट चर्चा सुरू आहे.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.
halo ini backlink