राष्ट्रीय समाज पक्ष माळशिरस तालुका पदाधिकारी व संवाद बैठक संपन्न

माळशिरस (बारामती झटका)
राष्ट्रीय समाज पक्ष आयोजित मा. बालकृष्ण लेंगरे (मामा) राष्ट्रीय संघटक यांच्या प्रेरणादायी अध्यक्षतेखाली तसेच सोलापूर जिल्हा अध्यक्ष मा. अनिल (दादा) शेंडगे यांच्या प्रमुख उपस्थितीत माळशिरस तालुका कार्यकारिणीच्या वतीने संवाद बैठक माळशिरस तहसील कार्यालयाजवळ पार पडली. तसेच माळशिरस तालुक्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची पूर्वतयारी यावेळी करण्यात आली.
तालुका अध्यक्ष व इतर पदाधिकारी यांनी पंचायत समिती संदर्भात चर्चा करून निवडणूक लढवण्याची तयारी अनेक कार्यकर्त्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी बोलून दाखवली. माळशिरस तालुक्यातील सर्व जिल्हा परिषद गट आणि सर्व पंचायत समिती गण स्वबळावर लढवण्याची तयारी करण्यात आली.

यावेळी माळशिरस तालुकाध्यक्ष मा. नारायण आबा देवकाते पाटील, रासप जेष्ठ नेते मा. कुंडलिक बापूराव रुपनवर, रासप युवा नेते मा. वैजनाथ पालवे, माळशिरस युवक तालुकाध्यक्ष मा. मामासाहेब भगवान खरात, युवा रासप नेते पै. रमेश हांडे, रासप नेते मा. पोपट गोरड, संभाजी आप्पासो भोसले, विलास भीमराव ढोले, धुळदेव आप्पा चोरमले, जयवंत देवकाते, तात्यासाहेब माने आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.



