रेडणी गावातील काळे मळ्यात खंडित विद्युत पुरवठा अखेर सुरळीत…

अॅड. दादा नरुटे यांच्या प्रयत्नातून वीजपुरवठा सुरळीत
रेडणी (बारामती झटका)
रेडणी गावातील काळे मळा परिसरात ट्रान्सफॉर्मर जळाल्यामुळे मागील दोन ते तीन महिन्यांपासून विद्युत पुरवठा पूर्णतः खंडित झाला होता. या दीर्घकालीन वीजखंडितीमुळे परिसरातील नागरिकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत होते. दैनंदिन कामकाज, शेती तसेच विद्यार्थ्यांचे शिक्षण यावरही याचा प्रतिकूल परिणाम होत होता.
ही गंभीर बाब अॅड. दादा नरुटे यांच्या निदर्शनास येताच त्यांनी तत्काळ काटी येथील महावितरण कार्यालय तसेच इंदापूर येथील महावितरण कार्यालयाशी सातत्याने संपर्क साधला. त्यांच्या पाठपुराव्यामुळे रेडणी काळे मळा येथील जळालेला ट्रान्सफॉर्मर त्वरित दुरुस्त करण्यात आला आणि अखेर नागरिकांना दिलासा देणारा विद्युत पुरवठा पुन्हा सुरळीत झाला. अॅड. दादा नरुटे यांच्या तत्परतेमुळे व प्रयत्नांमुळे अनेक दिवसांचा प्रश्न मार्गी लागल्याने नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.
वीजपुरवठा पूर्ववत झाल्याने आनंद व्यक्त करत काळे मळा येथील नागरिकांनी अॅड. दादा नरुटे यांचा सन्मान करून आभार मानले. यावेळी नवनाथजी शिंदे, विशाल बूनगे, पोपट काळे, हरिदास काळे, गोरख काळे, रमेश काळे, शरद काळे, गणेश काळे, मारुती बरकडे, अजित चव्हाण, दुर्योधन काळे, पप्पू चव्हाण आदी मान्यवर उपस्थित होते.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.



