रेडणी येथे घरगुती पद्धतीने पनीर बनविण्याचे प्रात्यक्षिक

रेडणी (बारामती झटका)
रेडणी येथे ग्रामीण जागरूकता कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत शिक्षण प्रसारक मंडळ अकलूज संचलित व महात्मा फुले कृषी विद्यापीठ अंतर्गत असलेल्या रत्नाई कृषी महाविद्यालय अकलूज येथील अंतिम वर्षातील विद्यार्थ्यांनी महिलांना दुधापासून पनीर बनविण्याचे प्रात्यक्षिक करून दाखवित मार्गदर्शन केले.
या प्रात्यक्षिकाचा मुख्य उद्देश महिलांना एक नवीन कुटीर उद्योग सुरू करण्यास व आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनवण्यास मदत करणे हा होता. पनीर हा पौष्टिक आणि बाजारात मागणी असलेला दुग्धजन्य पदार्थ असल्याने या प्रशिक्षणाला चांगला प्रतिसाद मिळाला. कार्यक्रमादरम्यान विद्यार्थ्यांनी या प्रकारच्या प्रशिक्षणामुळे दूध उत्पादन शेतकऱ्यांना केवळ दूध विकण्याऐवजी त्यावर प्रक्रिया करून (मूल्यवर्धन) अधिक नफा मिळवण्याची संधी मिळते, हे त्यांना पटवून दिले.
यावेळी कार्यक्रमात कृषीदूत रणजित कोडलकर, श्रीधर रावळे, भार्गव पानकडे, पृथ्वीराज आवताडे, अदित्य बनसोडे, आयान नदाफ, कृष्णा गुळवे, तेजस निल्लावार, विराज शिंदे यांनी उत्स्फुर्त सहभाग घेतला. प्रात्यक्षिकाचे आयोजन अकलूज शिक्षण प्रसारक मंडळाच्या माध्यमातून करण्यात आले होते. यासाठी संस्थेचे अध्यक्ष संग्रामसिंह मोहिते-पाटील, प्राचार्य आर. जी. नलावडे, प्रा. एस. एम. एकतपुरे, प्रा. एम. एस. चंदनकर तसेच विषय तज्ञ प्रा. एच. व्ही. कल्याणी यांचे मार्गदर्शन मिळाले.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.



