रेडणी येथे कृषीदुतांकडून शेतकऱ्यांना बँक कर्जाचे मार्गदर्शन

रेडणी (बारामती झटका)
रेडणी येथे महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी संलग्न अकलूज येथील रत्नाई कृषी महाविद्यालयाच्या ग्रामीण जागरूकता कार्यानुभव कार्यक्रमांर्गत कृषीदुतांकडून गावातील शेतकऱ्यांसाठी बँक कर्ज प्रस्ताव तयार करण्याचे प्रात्यक्षिक सादर करण्यात आले. या उपक्रमाचा उद्देश शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळवण्यासाठी आवश्यक असलेल्या बँक दस्तऐवजांची माहिती देणे आणि व्यावहारिक मार्गदर्शन करणे हा आहे. कृषीदुतांनी शेतकऱ्यांसमोर उदाहरणाद्वारे दाखवले की, बँक कर्जासाठी अर्ज कसा तयार करायचा, आवश्यक कागदपत्रे कोणती आहेत, आणि कर्ज मंजुरीसाठी कोणत्या गोष्टींचा विचार केला जातो.
प्रात्यक्षिकादरम्यान शेतकऱ्यांनी आपल्या शेतमालाची माहिती, जमीन व शेतीशी संबंधित आकडेवारी सादर करून कृषीदूतांशी संवाद साधला. शेतकऱ्यांना योग्य मार्गदर्शन दिल्यास ते बँकेकडून कर्ज मिळवणे अधिक सुलभ होते. यावेळी कृषीदुत रणजित कोडलकर, श्रीधर रावळे, भार्गव पानकडे, पृथ्वीराज आवताडे, अदित्य बनसोडे, आयान नदाफ, कृण्णा गुळवे, तेजस निल्लावार, विराज शिंदे यांनी या उपक्रमातून व्यावहारिक अनुभव मिळवला आणि शेतकऱ्यांसाठी आर्थिक साधनांची माहिती सुलभ पद्धतीने देण्याचे महत्व समजले.
यावेळी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष मा. संग्रामसिंह मोहिते पाटील, प्राचार्य आर. जी. नलावडे, कार्यक्रम समन्वयक प्रा. एस. एम. एकतपुरे, कार्यक्रम अधिकारी प्रा. एम. एम. चंदनकर तसेच विषयतज्ज्ञ प्रा. एस. वी. तरंगे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.



